एक्स्प्लोर

Pakistan Squad News : पाकिस्तान टीमची घोषणा अन् कराची ते लाहोरमध्ये खळबळ! लाडका बाबर आझम संघातून OUT, 6 नवीन चेहरे IN; कोण झाला कर्णधार?

Pakistan VS Bangladesh Squad For ODI Series : टी-20 वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत.

Pakistan Squad for ODI series VS Bangladesh : टी-20 वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. वरिष्ठ खेळाडूंवर कारवाई झाली असून युवा आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने बांगलादेश दौऱ्यासाठी 15 जणांचा एकदिवसीय (ODI) संघ जाहीर केला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांची ODI मालिका 11 ते 15 मार्चदरम्यान खेळवली जाणार असून सर्व सामने ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे होतील. संघाची धुरा पुन्हा एकदा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याच्याकडे सोपवण्यात आली आहे.

6 अनकॅप्ड खेळाडूंना संधी

या संघात 6 अशा खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांना अद्याप एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नाही. त्यामध्ये अब्दुल समद, माज सदाकत, मोहम्मद गाजी घोरी, साद मसूद, साहिबजादा फरहान आणि शमील हुसैन यांचा समावेश आहे.

यापैकी अब्दुल समद, माज सदाकत, साद मसूद आणि शमील हुसैन यांनी अलीकडेच पाकिस्तान शाहीन संघाकडून अबू धाबी येथे इंग्लंड लायन्सविरुद्ध सामने खेळले होते. युवा खेळाडूंवर विश्वास दाखवत संघ व्यवस्थापनाने भविष्यातील बांधणीचा स्पष्ट संदेश दिला आहे.

बाबर, फखर आणि सॅम अयुब बाहेर

सर्वात मोठा धक्का म्हणजे स्टार फलंदाज बाबर आझम, फखर झमान आणि सॅम अयुब यांना ODI संघातून वगळण्यात आले आहे. तसेच वेगवान गोलंदाज नसीम शाहलाही संघात स्थान मिळालेले नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. संघ सुपर-8 फेरीतच बाद झाला. स्पर्धेत बाबर आजमला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. संथ खेळी आणि दबावाच्या क्षणी धावा करण्यात अपयश आल्याने त्याच्यावर टीका झाली. त्यामुळेच त्याला एकदिवसीय संघातूनही बाहेर ठेवण्यात आल्याचे मानले जात आहे.

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, बाबर आजमने आपली शेवटची ODI मालिका नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध रावळपिंडी येथे खेळली होती आणि त्या मालिकेत त्याने नाबाद शतकही झळकावले होते. तरीदेखील PCB ने अलीकडील खराब फॉर्म लक्षात घेऊन हा कठोर निर्णय घेतल्याचे दिसते.

बांगलादेशविरुद्ध ODI मालिकेसाठी पाकिस्तान संघ

शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, फहीम अशरफ, फैसल अकरम, हारिस रऊफ, हुसैन तलत, माज सदाकत, मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), मोहम्मद वसीम ज्युनियर, मोहम्मद गाजी गोरी (यष्टिरक्षक), साद मसूद, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा आणि शमील हुसैन.

पाकिस्तान vs बांगलादेश ODI मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

  • 11 मार्च – पहिला ODI, ढाका
  • 13 मार्च – दुसरा ODI, ढाका
  • 15 मार्च – तिसरा ODI, ढाका

हे ही वाचा -

ICC T20 Rankings Update : संजू सॅमसनचं ICC रँकिंगमध्ये वादळ! 25 खेळाडूंना टाकलं मागे; सूर्या मात्र तोंडावर पडला, अभिषेक शर्माचं काय झालं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SRH vs CSK IPL 2026 : जिंकता जिंकता हरले... शेवटच्या 10 मिनिटांत हैदराबादने असा उलटवला डाव की चेन्नई पाहतच राहिली; नेमकं काय घडलं?
जिंकता जिंकता हरले... शेवटच्या 10 मिनिटांत हैदराबादने असा उलटवला डाव की चेन्नई पाहतच राहिली; नेमकं काय घडलं?
SHR vs CSK Update IPL 2026 : राजीव गांधी स्टेडियमवर हाय-व्होल्टेज ड्रामा! शेवटच्या षटकात हैदराबादने चेन्नईच्या जबड्यातून खेचून आणला विजय
राजीव गांधी स्टेडियमवर हाय-व्होल्टेज ड्रामा! शेवटच्या षटकात हैदराबादने चेन्नईच्या जबड्यातून खेचून आणला विजय
RCB vs DC IPL 2026 : दिल्लीची 'दबंग'गिरी! आरसीबीचा गड उद्ध्वस्त, अक्षर पटेलच्या चाणक्यनीतीने बंगळुरूचा 'गेम' ओव्हर; डीसीची गुणतालिकेत टॉप-4 मध्ये एन्ट्री
दिल्लीची 'दबंग'गिरी! आरसीबीचा गड उद्ध्वस्त, अक्षर पटेलच्या चाणक्यनीतीने बंगळुरूचा 'गेम' ओव्हर; डीसीची गुणतालिकेत टॉप-4 मध्ये एन्ट्री
RCB vs DC IPL 2026 : दिल्लीचा दणदणीत विजय; बंगळुरूला घरच्या मैदानावर धक्का, 6 विकेट्सने पराभव
दिल्लीचा दणदणीत विजय; बंगळुरूला घरच्या मैदानावर धक्का, 6 विकेट्सने पराभव
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Embed widget