एक्स्प्लोर
योगेश्वर दत्तच्या गावी होमहवन, फोनवरुन आईचा आशिर्वाद
सोनिपत (हरियाणा): भारताचा पैलवान योगेश्वर दत्तची आज रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिली लढत आहे. या लढतीत आपण जिंकू, तसंच सुवर्णपदक घेऊनच भारतात येऊ, असा विश्वास योगेश्वर दत्तने आईला फोनवरुन दिला आहे. योगेश्वर दत्तला विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या गावात यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे.
योगेश्वर दत्तची ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा आहे. त्याने संपूर्ण जिवन कुस्तीला समर्पित केलं आहे. त्यामुळे शेवटच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणं हेच त्याचं सर्वात मोठं स्वप्न आहे, असं योगेश्वर दत्तच्या आईने सांगितलं. योगेश्वर दत्तने फोनवरुन आईचा आशिर्वाद घेतला आणि पदक जिंकण्याचा निर्धारही केला आहे.
योगेश्वर नक्कीच पदक जिंकेल, असा विश्वास आईनेही व्यक्त केला आहे. योगेश्वर पदकाची कमाई करुन आल्यानंतर तो विवाह बंधनात अडकणार आहे. त्याच्यासाठी मुलगी पाहून ठेवली असल्याची माहितीही योगेश्वरच्या आईने दिली. रिओ ऑलिम्पिकमध्ये आज सायंकाळी 5 वाजता योगेश्वर दत्तचा सामना होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement