एक्स्प्लोर
आता एक वर्ष याची गरज नाही, वडिलांनी स्मिथची क्रिकेट किट गुंडाळली
स्मिथ आणि वॉर्नर यांनी या प्रकरणी चाहत्यांची आणि देशाची माफीही मागितली. मात्र या दोन्ही खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही या प्रकरणाता मनस्ताप झाला आहे.

सिडनी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंद घालण्यात आली. दोघांनीही या प्रकरणी चाहत्यांची आणि देशाची माफीही मागितली. या दोन्ही खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही या प्रकरणाता मनस्ताप झाला आहे. स्मिथने सिडनीत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी तो हमसून हमसून रडला. त्यानंतर आता त्याच्या वडिलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पीटर स्मिथ आपल्या मुलाची क्रिकेट किट बॅग पॅक करताना दिसत आहेत. याबाबत पीटर स्मिथ यांना विचारण्यात आलं. पुढचं एक वर्ष आपला मुलगा क्रिकेट खेळणार नाही. त्यामुळे ही किट बॅग पॅक करुन बाजूला ठेवून देणंच चांगला पर्याय आहे, असं ते म्हणाले. दक्षिण आफ्रिकेहून सिडनीमध्ये पोहोचल्यानंतर स्मिथने पत्रकार परिषद घेतली आणि आपली चूक झाली, हे मान्य केलं होतं. ''मला माफ करा. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून मी झाल्या प्रकाराची सर्व जबाबदारी स्वीकारतो. बॉल टॅम्परिंग माझी घोडचूक होती,'' अशी कबुली स्मिथने दिली. हे सांगतानाच त्याला रडूही कोसळलं. स्मिथवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे बारा महिन्यांची बंद घातली. शिवाय त्याची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आणि तो पुन्हा कधीही कर्णधार होऊ शकणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं.
आणखी वाचा























