एक्स्प्लोर
Advertisement
गेलं वर्ष म्हणजे 'आसमान से जमीन तक का सफर' : करुण नायर
या एका वर्षाचा प्रवास म्हणजे ‘आसमान से जमीन तक का सफर’, असा होता, असं करुण नायर म्हणाला.
नवी दिल्ली : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताकडून त्रिशतक ठोकणारे दोनच खेळाडू आहेत. त्यामध्ये एक वीरेंद्र सेहवाग आहे, तर दुसरा करुण नायर. वीरेंद्र सेहवागबद्दल क्रिकेटप्रेमींना वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र करुण नायर हा असा चेहरा आहे, जो जेवढ्या लवकर शिखरावर पोहोचला, तेवढ्याच लवकर पायथ्याशीही आला.
स्वतः करुण नायरलाही या गोष्टीची जाणीव झाली आहे, की गेल्या एक वर्षात आपण कुठून कुठे आलो आहोत. खेळात किती चढ आणि उतार असतात, याचा अनुभव करुण नायरला गेल्या 12 महिन्यात आला.
डिसेंबर 2016 मध्ये कसोटीत त्रिशतक ठोकल्यानंतर करुण नायरची जोरदार चर्चा झाली. मात्र तेव्हापासून तो क्रिकेटच्या एकाही फॉरमॅटमध्ये भारतीय संघात सहभागी होण्याच्या शर्यतीत नाही.
करुण नायरची नजर आता दुखापतग्रस्त आर विनय कुमारच्या अनुपस्थितीत कर्नाटकला विजय हजारे ट्रॉफीमध्ये चॅम्पियन बनवण्यावर आहे. क्वार्टर फायनलमध्ये कर्नाटकची टक्कर आज हैदराबादशी होणार आहे. दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडिअमवर हा सामना खेळवण्यात येईल.
त्रिशतकानंतरच्या करिअरबाबत करुण नायरला प्रश्न विचारण्यात आला. गेल्या एका वर्षाने मला सर्व काही शिकवलं आहे. या एका वर्षाचा प्रवास म्हणजे ‘आसमान से जमीन तक का सफर’, असा होता, असं करुण नायर म्हणाला.
भावनात्मक परिस्थितीतून कसं सावरायचं ते या अनुभवातून शिकलो. तुम्ही यशाच्या शिखरावर असता तेव्हा उंच उडू शकत नाही. कारण, तुम्ही कधीही खाली कोसळू शकता. एका सामान्य व्यक्तीप्रमाणेच रहावं लागतं, हे गेल्या एका वर्षात शिकलो, असं करुण नायर म्हणाला.
करुण नायरचं ऐतिहासिक त्रिशतक
चेन्नई कसोटीत टीम इंडियाचा मधल्या फळीतील नवखा फलंदाज करुण नायरने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. पदार्पणाच्या कसोटी मालिकेत नायरने इंग्लंडविरुद्ध धडाकेबाज नाबाद त्रिशतक झळकावलं. नायरच्या दणदणीत त्रिशतकाच्या जोरावर भारताने पहिला डाव 7 बाद 759 धावांपर्यंत मजल मारून, डाव घोषित केला होता. नायरने 381 चेंडूत 32 चौकार आणि 4 षटकार ठोकून त्रिशतकाला गवसणी घातली.
करुण नायर हा आपल्या पहिल्याच कसोटी शतकाचं त्रिशतकाच रुपांतर करणारा आजवरचा तिसराच खेळाडू ठरला. याआधी गॅरी सोबर्स आणि बॉबी सिम्पसन यांनी असा पराक्रम गाजवला होता.
तसंच करुण नायर हा कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला. याआधी वीरेंद्र सहवागने कसोटी क्रिकेटमध्ये दोन वेळा त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर आता करुण नायरनं इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत त्रिशतक साजरं केलंय.
संबंधित बातम्या :
स्पेशल रिपोर्ट: करुण नायरचं त्रिशतक, 52 वर्षांनी विक्रम !
ही संधी सोडू नकोस, त्रिशतक नक्कीच ठोकशील: जाडेजा
वयाच्या 10 व्या वर्षापासूनच त्याच्या नसानसात क्रिकेट : करुणचे वडिल
मृत्यू जवळून पाहिला, मग त्रिशतकाचं ओझं कसलं: करुण नायर
इंग्लंडविरुद्ध करुण नायरचं त्रिशतक, भारताकडे 270 धावांची आघाडी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement