एक्स्प्लोर
Advertisement
शमीवरील आरोप बिनबुडाचे, पाकिस्तानी तरुणी आलिश्बाचा दावा
मॅच फिक्सिंगचे आरोप हे पूर्णपणे बिनबुडाचे असल्याचा दावा आलिश्बाने केला. शमी धोका कधीच देऊ शकत नाही, असं म्हणत चौकशीत सर्व प्रकारचं सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचं ती म्हणाली.
नवी दिल्ली : पत्नी हसीन जहाच्या आरोपांनंतर अडचणीत आलेला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पाकिस्तानी मैत्रिण आलिश्बा आता समोर आली आहे. मॅच फिक्सिंगचे आरोप हे पूर्णपणे बिनबुडाचे असल्याचा दावा आलिश्बाने केला. शमी धोका कधीच देऊ शकत नाही, असं म्हणत चौकशीत सर्व प्रकारचं सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचं ती म्हणाली.
आलिश्बासोबतच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट असल्याचा आरोप हसीन जहाने केला होता. ज्यामध्ये शारीरिक संबंध आणि पैशांची देवाणघेवाण करण्याविषयी चर्चा करण्यात आली. बीसीसीआय शमीला पैसे देत असताना तो पाकिस्तानी तरुणीकडून पैसे का घेतो, असा सवाल हसीन जहाने उपस्थित केला होता. दरम्यान, मोहम्मद शमीनेही हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला होता.
मोहम्मद शमी प्रकरणावर आलिश्बा काय म्हणाली?
''शमीवर जे आरोप करण्यात आले आहेत, त्यातून त्याला वाचवण्यासाठी तुम्ही सांगाल तिथे मी जायला तयार आहे. कारण, शमी अशी व्यक्ती नाही, जी देशाला धोका देईल. तो कधीही धोका देऊ शकत नाही. त्याच्यावर अत्यंत घाणेरड्या पद्धतीचे आरोप लावण्यात आले आहेत,'' असं आलिश्बा म्हणाली.
''चौकशी करायची असेल तर बिनधास्त करु शकता. त्याचा मॅच फिक्सिंगशी संबंध नाही. त्यामुळे मला कसलीही चिंता नाही. मैत्रीचे संबंध मॅच फिक्सिंगशी जोडल्याने मी आवाक आहे. पैशांचा विषय झाला असला तरी त्याचा मॅच फिक्सिंगशी काय संबंध? कृपा करुन आमच्या मैत्रिला मॅच फिक्सिंगशी जोडू नये,'' अशी विनंतीही आलिश्बाने केली.
मोहम्मद शमीसोबत असलेल्या संबंधांवरही आलिश्बाने स्पष्टीकरण दिलं. ''शमीला इंस्टाग्रामवर फॉलो करत होते आणि त्यातूनच आमची मैत्री झाली. लाखो चाहते त्याला फॉलो करतात, तशीच मी देखील एक आहे. पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तेव्हा त्याला मेसेज केला होता. त्याचा पाकिस्तानच्या चाहत्याशी वाद झाला होता, असं ऐकण्यात आलं म्हणून तो मेसेज केला. भारत आणि पाकिस्तानचे सामने नेहमीच पाहते,'' असं स्पष्टीकरण आलिश्बाने दिलं.
''आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्या वादानंतर मोहम्मद शमी कोण आहे हे जाणून घ्यायचं होतं. त्यानंतर त्याला मेसेज केला आणि बोलणं सुरु झालं. शमीने मेसेजला रिप्लाय दिला नाही, मात्र ईदला त्याला पुन्हा मेसेज केला, तेव्हा त्याचं उत्तर आलं.. जूनमध्ये... तेव्हाच त्याच्याशी मैत्री झाली,'' अशी माहिती आलिश्बाने दिली.
''दुबईमध्ये मोहम्मद शमीसोबत भेट झाल्याची कबुलीही आलिश्बाने दिली. दुबईमध्ये बहिण राहत असल्यामुळे तिच्याकडे नेहमीच जाणं-येणं असतं. मोहम्मद शमीला भेटण्याची इच्छा तर होतीच, एक माणूस म्हणून तो अत्यंत चांगला आहे. बोलणं सुरु झाल्यानंर कोणताही चाहता सेलिब्रिटीला स्वाभाविकपणे भेटण्याची इच्छा व्यक्त करेनच, तसंच मी देखील केलं,'' असं आलिश्बाने सांगितलं.
''माझ्या मनात शमीविषयी अत्यंत आदर आहे. त्याच्याशी भेट होणं ही माझी इच्छा होती आणि ती फार मोठी गोष्ट आहे, असं वाटत नाही. तो दुबईहून भारतात जाणार आहे, याची माहिती मिळाली आणि तेव्हाच मी दुबईला बहिणीकडे जाणार होते. दक्षिण आफ्रिकेहून येताना तो दुबईहून आला आणि मी तेव्हा तिथेच होते. त्यामुळे भेट घेण्याचं ठरलं,'' अशी माहिती आलिश्बाने दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
नागपूर
Advertisement