एक्स्प्लोर

विनेश फोगाटने एका दिवसात तीन लढती खेळल्या; शरीरातील लिक्विड कमी झालं अन्...; धक्कादायक माहिती समोर

Vinesh Phogat Disqualified Paris Olympics 2024: विनेश फोगाटचे 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त आढळून आल्याने विनेश फोगाटला अपात्र करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Vinesh Phogat Disqualified Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमधील (Paris Olympics 2024) 50 किलो फ्रीस्टाइल गटात अंतिम फेरी गाठणारी भारताची धाकड गर्ल कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat Disqualified) अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त आढळून आल्याने विनेश फोगाटला अपात्र करण्याचा निर्णय घेतला आहे. 

स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. विनेश फोगाटचे वजन जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून रात्रभर हालचाली सुरु होत्या. मात्र, बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. यानंतर विनेश फोगाटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

विनेश फोगाटचं वजन का वाढलं?

विनेश फोगाटला काल एका दिवसात तीन लढती खेळाव्या लागल्या. या तीन लढती खेळल्यामुळे तिच्या शरीरातील लिक्विड कमी झाले. म्हणूनच ऑलिम्पिक कमिटीच्या वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार डीहायड्रेट होऊ नये यासाठी तिला लिक्विड देण्यात आले.  त्यामुळेच जेव्हा विनेश फोगाटचे वजन केले गेले तेव्हा पोटातील ते लिक्विडमुळे तिचे वजन वाढले, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अपराजित यूई सुसाकीला विनेश फोगाटने लोळवलं होतं-

विनेश फोगटनं उपांत्य फेरीत जपानच्या दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आणि वर्ल्ड चॅम्पियन युई सुसाकी चा 3-2 असा पराभव केला. विनेश फोगटनं युई सुसाकीला पराभूत करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा उलटफेर केला आहे. विनेश फोगट आणि युई सुसाकी हिचा सामना जेव्हा सुरु झाला तेव्हा अनेकांना युई  सुसाकी ही विजयाची प्रमुख दावेदार वाटत होती. युई सुसाकीनं तिच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकही पराभव स्वीकारला नव्हता. राष्ट्रीय करिअरमध्ये तिला तीन वेळा पराभव स्वीकारावा लागला होता. जपानच्या इरी युकी हिनं तिचा पराभव केला होता. मात्र, युई सुसाकीचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आतापर्यंत एकही पराभव झाला नव्हता विनेश फोगटनं यूकी सुसाकीला 3-2 असं पराभूत करत इतिहास रचला. युई सुसाकीला पराभूत करणं आंतरराष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत कुणालाही जमलेलं नव्हतं. भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिनं ती कामगिरी करुन दाखवली होती. यानंतर विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. विनेश फोगाटने अंतिम फेरी गाठल्यानंतर संपूर्ण भारतात आनंद दिसत होता. परंतु आता विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याने सर्वत्र निराशा पसरली आहे.

संबंधित बातमी:

Vinesh Phogat: विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र; भारताला मोठा धक्का, एका रात्रीत काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
WhatsApp Update : व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?
व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lai Bhari Award 2024 : सुपर डुपर डान्स ते खतरनाक शायरी : लय भारी पुरस्कार 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-Rajan Salvi Shiv Sena UBT : ठाकरेंना मोठा धक्का बसणार? राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीतDevendra Fadnavis : माओवादावर अंतिम प्रहार करण्याची वेळ, लवकरच महाराष्ट्र माओवाद मुक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
WhatsApp Update : व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?
व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?
Manoj Jarange Patil: वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
Rajan Salvi: राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
Accident : सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
Embed widget