Tokyo Olympics 2020 : तिरंदाजीत अतानू दासची क्वार्टर फायनलमध्ये धडक, दोन वेळच्या ऑलिम्पिक चॅम्पियनचा केला पराभव
Tokyo Olympics : अतनू दासनं क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवलं असून पदकाच्या दिशनं अतनूनं आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे.
Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतीय तीरंदाज (India’s Archer) अतानू दासनं (Atanu Das) पुरुष एकेरी प्री-क्वार्टर्समध्ये धडक दिली आहे. अतानू दासनं दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन कोरियन तीरंदाजाला मात देत विजय मिळवला आहे. दोघांमध्ये अटीतटीची लढत रंगल्याचं पाहायला मिळालं. या सामन्यादरम्यान अतानू दासची पत्नी आणि भारताची महिला तीरंदाज दीपिका कुमारी (Deepika Kumari) सतत अतूनला प्रोत्साहन देताना दिसली.
यापूर्वी अतानू दासनं राउंड ऑफ 32 चा सामनाही शूट ऑफमध्ये खिशात घातला होता. त्यानं राउंड ऑफ 32 मध्ये चिनी ताइपेचया तीरंदाज डेंग यू चेंग कोको 6-4 नं मात दिली. या सामन्यात जिंकल्यानंतर अतानू समोर कोरियन तीरंदाजाचं मोठं आव्हान होतं. जे अतानूनं दिमाखात पार केलं.
पीव्ही सिंधूची डेन्मार्कच्या मियावर मात, क्वार्टर फायनल्समध्ये मिळवलं स्थान
बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूकडून भारतीयांना पदकाच्या अपेक्षा आहेत. सिंधूनं आज टोकियो ऑलिम्पिकमधील आपला सलग तिसरा सामना जिंकला आहे. डेन्मार्कच्या मियाचा पराभव करत सिंधूनं क्वार्टर फायनल्समध्ये स्थान मिळवलं आहे. सिंधूनं राउंड ऑफ 16 च्या सामन्यात सिंधूनं डेन्मार्कच्या मियाचा एकतर्फी परभाव करत विजय मिळवला. पीव्ही सिंधूनं 21-15 आणि 21-13 अशा फरकानं राउंड ऑफ 16चा सामना आपल्या खिशात घातला आहे. पीव्ही सिंधूनं क्वॉर्टर फायन्सच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे.
पीव्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये आपली उत्तम कामगिरी करताना दिसून येत आहे. राउंड ऑफ 16च्या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं डेन्मार्कच्या मिया विरोधातील पहिला गेम जिंकला. पीव्ही सिंधूनं पहिला गेम 21-15 नं आपल्या नावे केला. अशातच दुसरा सामनाही सिंधूनं 21-13 अशा फरकानं जिंकत सामना आपल्या खिशात घातला. या सामन्यात सिंधूनं मिया ब्लिचफेल्टचा सहज पराभव केला. सिंधूनं दोन सेटमध्येच मियाचं आव्हान संपुष्टात आणलं. सिंधूचा हा टोकियो ऑलिम्पिकमधील सलग तिसरा विजय आहे. या विजयासह सिंधूनं पदकाच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकलं आहे.
Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाचा दणदणीत विजय, ऑस्ट्रेलियासोबतच्या पराभवानंतर सलग दुसरा विजय
भारतीय पुरुष हॉकी संघानं अर्जेंटीनावर मात करत 3-1 अशा फरकानं विजय मिळवला आहे. भारतानं अर्जेंटीनासारख्या मजबूत संघाला पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाकडून विजयाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारतानं ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या फॉर्मात आहे.
टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघानं धमाकेदार विजय मिळवला आहे. भारतीय संघानं आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर रियो ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट असलेल्या अर्जेंटीनाला 3-1 अशा फरकानं पराभूत केलं. अर्जेंटीनाचा पराभव केल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघ आपल्या ग्रुपमधील टॉप 2 संघांमध्ये सहभागी झाला आहे. ग्रुप स्टेजवर शेवटचा सामना जपानसोबत 30 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Tokyo Olympics 2020 LIVE : टोकियो ऑलिम्पिकमधील प्रत्येक घडामोडींसाठी क्लिक करा...