एक्स्प्लोर

Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी

Santosh Bangar : शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.

हिंगोली : शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत मतदान करत असताना गोपनीयतेचा भंग केला आहे.  याशिवाय मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेत घोषणाबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आला.  हिंगोली नगरपालिकेसाठी शिवसेना आमदार संतोष बांगर हे मतदान करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कन्या शाळा मंगळवारा या ठिकाणी मतदान केंद्रावर गेले होते. संतोष बांगर यांनी मतदान कक्षात जाऊन त्यांनी एका महिलेला मतदान चिन्ह सांगून गोपनीयतेचा भंग केला. त्याचबरोबर घोषणा दिल्या म्हणून संतोष बांगर यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुरुवातीपासून एबीपी माझा ने ही बातमी लावून धरली होती या बातमीचा मोठा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी निवडणूक आयोगाने संतोष बांगर यांची आमदारकी रद्द केली पाहिजे, अशी मागणी केली आहे. 

संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी : संदेश देशमुख 

संतोष बांगर यांनी आज मतदान केंद्रामध्ये जात गोपनीयतेचा भंग केला. यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी बांगर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बांगर यांनी हिंगोली जिल्ह्याचा बिहार करून ठेवला आहे. निवडणूक आयोग जिवंत असेल तर बांगर यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केली आहे. 

आमदार संतोष बांगर यांनी गोपनीयतेचा नाहीतर आचारसंहितेचा भंग केला आहे. दंडुकेशाही दडपशाहीच्या माध्यमातून हातात मोबाईल घेऊन घोषणा देत आहेत.  मतदारांना या निशाणीवर मतदान करण्याचं सांगत आहेत त्यामुळं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे, अशी मागणी संदेश देशमुख यांनी केली. 

निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कार्यवाही करेल. बूथ वरील सर्व अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे आणि पोलिसांना देखील निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी संदेश देशमुख यांनी केली. 

एकनाथ शिंदे यांचं संतोष बांगर यांना समर्थन आहे का? असा सवाल देखील देशमुख यांनी केला.  संतोष बांगर यांनी हिंगोलीची परिस्थिती बिहार पेक्षा ही वाईट करून ठेवलेली आहे, अशी टीका देखील संदेश देशमुख यांनी केली. 

दरम्यान, हिंगोलीत साडेपाच वाजल्यानंतर मतदानाची वेळ संपली असून मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget