Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
वर्धामध्ये एका तरूणाने लग्नाआधी मतदानाचा हक्क बजावला, पुलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत अक्षय बहादूरकर बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानासाठी पोहोचला, पुलगावमधील मतदान केंद्र ७४ वर अक्षयने आपला मतदानाचा हक्क बजावला
लग्नाला अगदी काहीवेळ शिल्लक असताना नाशिकच्या येवलामध्ये वधुवरांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय, येवल्यातील फत्तेबुरूज नाका येथे वधुवरांनी मतदान केलं, नवरदेवाच्या सजलेल्या गाडीतून वधूवरांनी पहिलं मतदान केंद्र गाठून आपला हक्क बजावला...
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मतदान केंद्रावर नव्या वधुवरांनी मतदानाचा हक्क बजावला, एकीकडे विवाहसोहळा सुरू असताना वेळात वेळ काढून वधुवरांनी मतदान केल्याचं पाहायला मिळालं, त्र्यंबकेश्वरच्या आनंद पंचायती मतदान केंद्रावर या वधुवरांनी आपला हक्क बजावला, यावेळी त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी मतदानाला महत्त्व दिल्याची प्रतिक्रिया नववधुने दिली...
रत्नागिरीत लग्नाआधी नवरीने मतदानाचा हक्क बजावलाय....नववधू समृद्धी सुर्वेनं लग्न लागण्यापूर्वी मतदान केलं आणि त्यानंतर लगीनगाठ बाधली...
मालवणमध्येही लग्नापूर्वी नवरीनं मतदानाचा हक्क बजावलाय, सर्व मतदारांनी मतदान करावं असं आवाहन नवरी मतदारांना केलंय...लग्नापूर्वी मतदान करणाऱ्या नवरीचं आता सर्वस्तरातून कौतुक होतंय...
रत्नागिरीत नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मतदान करणं आवश्यक असल्याचं म्हणत नवरदेवाने आधी मतदानाचा हक्क बजावला, लग्नाची गाठ बांधण्याआधी नवरदेवाने आधी मतदानाचा हक्क बजावला, राहुल शिवलकर लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी मतदान केंद्र गाठलं
आजच्या मतदानादिवशी नाशिकच्या मनमाडमधील शिवसेनेच्या उमेदवाराने लग्नाची गाठ बांधली..मात्र शिवसेनेचे उमेदवार रोहन सांगळे यांनी लग्नाची गाठ बांधण्याआधी मतदानाचा हक्क बजावलाय..मतदान आणि लग्न एकाच दिवशी आल्याने उमेदवाराची चांगलीच धावपळ उडाली..
भंडारा नगरपरिषद निवडणुकीत लग्न लागल्यानंतर वधू वरानं मतदानाचा हक्का बजावलाय.. लग्नाचे विधी पूर्ण होताच वधू-वर थेट मतदान केंद्रावर पोहोचले.. आणि दोघांनी मतदानाचा हक्का बजावलाय...























