Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आज सर्वत्र मतदान पार पडलं. मात्र मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्याऐवजी अनेक ठिकाणी गोंधळ, राडे, हाणामारी आणि जोरदार बाचाबाचीचे प्रकार समोर आले. काही मतदान केंद्रांवर तर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते समोरासमोर येत वातावरण एकदा ताणलं गेल्याचं दिसलं.
मतदान केंद्रांच्या परिसरात झालेल्या या राड्यांमुळे काही ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तैनात केली होती. तरीही काही केंद्रांवर ढकलाढकली, आरोप–प्रत्यारोप आणि तुफान वादविवाद सुरूच राहिले.ज्या ठिकाणी मतदान, त्या ठिकाणी राडा अशी स्थिती पाहायला मिळाल्याने निवडणूक प्रक्रियेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून प्रशासनाकडून या घटनांची दखल घेण्याची मागणी होत आहे.
नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानावेळी रायगडच्या महाडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला, शिवसेनेचे विकास गोगावले समर्थक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुशांत जाबरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, यात सुशांत जाबरेंच्या वाहनांची तोडफो़डदेखील करण्यात आली, सुशांत जाबरे हे महाड मधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले असता हा राडा झाला...दरम्यान या ठिकाणी आता रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी आढावा घेतलाय..
नंदुरबारच्या शहादा मतदान केंद्रावर दोन गटात राडा झालाय.. भाजप आणि जनता विकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालंय..किरकोळ कारणांवरून कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेलेत.. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आलीय...



















