एक्स्प्लोर

Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाचा दणदणीत विजय, ऑस्ट्रेलियासोबतच्या पराभवानंतर सलग दुसरा विजय

Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघानं अर्जेंटीनावर मात करत दणदणीत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियासोबतच्या पराभवानंतर हा सलग दुसरा विजय आहे.

Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघानं अर्जेंटीनावर मात करत 3-1 अशा फरकानं विजय मिळवला आहे. भारतानं अर्जेंटीनासारख्या मजबूत संघाला पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाकडून विजयाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारतानं ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या फॉर्मात आहे.

टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघानं धमाकेदार विजय मिळवला आहे. भारतीय संघानं आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर रियो ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट असलेल्या अर्जेंटीनाला 3-1 अशा फरकानं पराभूत केलं. अर्जेंटीनाचा पराभव केल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघ आपल्या ग्रुपमधील टॉप 2 संघांमध्ये सहभागी झाला आहे. ग्रुप स्टेजवर शेवटचा सामना जपानसोबत 30 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. 

भारत विरुद्ध अर्जेंटीनाच्या सामन्याचा थरार शेवटच्या क्वार्टरमध्ये पाहायला मिळाला. चौथ्या क्वार्टरमध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. पण सर्वात शेवटी भारतीय खेळाडूंनी आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर सामना खिशात घातला. सामन्यात भारताकडून वरुण कुमार, विवेक आणि हरमनने गोल डागले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये हरमनने आतापर्यंत 3 गोड डागले आहेत. भारत आणि अर्जेंटीना यांच्यातील सामन्यात पहिले दोन क्वार्टर गोलरहित राहिले. भारतानं सुरुवातीपासूनच आक्रमक हॉकीच्या जोरावर अर्जेंटीनावर दबाव आणला होता. 

Tokyo Olympics : पीव्ही सिंधूची डेन्मार्कच्या मियावर मात, क्वार्टर फायनल्समध्ये मिळवलं स्थान

बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूकडून भारतीयांना पदकाच्या अपेक्षा आहेत. सिंधूनं आज टोकियो ऑलिम्पिकमधील आपला सलग तिसरा सामना जिंकला आहे. डेन्मार्कच्या मियाचा पराभव करत सिंधूनं क्वार्टर फायनल्समध्ये स्थान मिळवलं आहे. सिंधूनं राउंड ऑफ 16 च्या सामन्यात सिंधूनं डेन्मार्कच्या मियाचा एकतर्फी परभाव करत विजय मिळवला. पीव्ही सिंधूनं 21-15 आणि 21-13 अशा फरकानं राउंड ऑफ 16चा सामना आपल्या खिशात घातला आहे. पीव्ही सिंधूनं क्वॉर्टर फायन्सच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे. 

पीव्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये आपली उत्तम कामगिरी करताना दिसून येत आहे. राउंड ऑफ 16च्या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं डेन्मार्कच्या मिया विरोधातील पहिला गेम जिंकला. पीव्ही सिंधूनं पहिला गेम 21-15 नं आपल्या नावे केला. अशातच दुसरा सामनाही सिंधूनं 21-13 अशा फरकानं जिंकत सामना आपल्या खिशात घातला. या सामन्यात सिंधूनं मिया ब्लिचफेल्टचा सहज पराभव केला. सिंधूनं दोन सेटमध्येच मियाचं आव्हान संपुष्टात आणलं. सिंधूचा हा टोकियो ऑलिम्पिकमधील सलग तिसरा विजय आहे. या विजयासह सिंधूनं पदकाच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Tokyo Olympics 2020 LIVE : टोकियो ऑलिम्पिकमधील प्रत्येक घडामोडींसाठी क्लिक करा...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget