एक्स्प्लोर

Hardik Pandya :  हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या नाबाद 77 धावांच्या जोरावर बडोद्यानं पंजाबवर 7 विकेटनं विजय मिळवला. शिवलिक शर्मा आणि विष्णू सोळंकीनं दमदार फलंदाजी केली. 

हैदराबाद : सध्या बीसीसीआयकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचं आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेतील सामने हैदराबादच्या स्टेडियमवर सुरु आहेत. आज या स्पर्धेत पंजाब आणि बडोदा आमने सामने आले होते. भारताच्या टी 20 संघाचे स्टार खेळाडू अभिषेक शर्मा आणि हार्दिक पांड्या आमने सामने येणार असल्यानं या सामन्याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. पंजाबनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 बाद 222  धावा केल्या. यामध्ये अभिषेक शर्मा आणि अनमोलप्रित सिंग याच्या अर्धशतकाचा समावेश होता. तर,बडोद्याकडून फलंदाजी करताना हार्दिक पांड्यानं नाबाद 77  धावा करत पंजाबला पराभूत केलं. 

अभिषेक शर्मा-अनमोलप्रीत सिंगची दमदार फलंदाजी

पंजाबनं पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि अनमोलप्रीत सिंगच्या अर्धशतकांच्या जोरावर 8 बाद 222  धावा केल्या. अभिषेक शर्मानं 18 बॉलमध्ये 50 धावा केल्या. तर, अनलमोलप्रीत सिंगनं 32 बॉलमध्ये 69  धावा केल्या. नमन धीर यानं 39 धावा करत पंजाबच्या धावसंख्येला 20 ओव्हरमध्ये 8  बाद 222 पर्यंत पोहोचवलं. बडोद्याच्या राज लिम्बानी यानं पंजाबच्या 3 विकेट घेतल्या. हार्दिक पांड्यानं चार ओव्हरमध्ये 52  धावा देत 1 विकेट घेतली. 

हार्दिक पांड्याची व्याजासह परतफेड, बडोद्याचा दणदणीत विजय

पंजाबनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 8  बाद 222  धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना बडोद्याच्या विष्णू सोळंकी आणि शाश्वत रावत यांनी पहिल्या विकेट साठी 66 धावांची भागीदारी केली. शाश्वत रावत यानं 31  धावा केल्या. तर विष्णू सोळंकी यानं 43  धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शिवलिक शर्मानं 47 धावा केल्या. हार्दिक पांड्या यानं नाबाद 77  धावा करत पंजाबच्या फलंदाजांनी केलेल्या धुलाईची परतफेड व्याजासह केली. हार्दिक पांड्यानं 42 बॉलमध्ये 4 षटकार आणि 7 चौकारासह नाबाद 77  धावा केल्या. 

बडोद्याच्या संघानं पंजाबच्या 222 धावांचा पाठलाग 20 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर यशस्वीपणे पूर्ण केला. हार्दिक पांड्यानं तुफानी फलंदाजी करत नाबाद 77 धावा केल्या.हार्दिक पांड्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत आजच्या सामन्यात अभिषेक शर्मानं दमदार फलंदाजी केली. त्यानंतर हार्दिक पांड्यानं देखील 4 ओव्हर गोलंदाजी केली आणि त्यानंतर दमदार फलंदाजी केली. 

हार्दिक पांड्या आशिया कपमध्ये दुखापतग्रस्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20 मालिकेला मुकला होता. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याची पुन्हा संघात निवड होऊ शकते. आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या निमित्तानं हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट असणं आणि फॉर्ममध्ये असणं टीम इंडियासाठी महत्त्वाचं आहे. टी 20 वर्ल्ड कप फेब्रुवारी- मार्चमध्ये भारत- श्रीलंकेत होणार आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
Embed widget