एक्स्प्लोर

Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या

Gold Silver Rate: 2025 मध्ये सोने आणि चांदीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केले मालामाल झाले आहेत. चांदीच्या दरात वर्षभरात 85 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

Gold Silver Rate नवी दिल्ली : भारतात 2025 या वर्षात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये ऐतिहासिक वाढ झाली आहे. डिसेंबर 2025 च्या सुरुवातीपर्यंत सोनेच्या दरात 66 टक्क्यांची वाढ झाली होती. तर, चांदीच्या दरात देखील 85 टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात कपातीची शक्यता असल्यानं आणि डॉलर कमजोर होणं आणि भारतीय रुपया कमजोर झाल्यानं सोने आणि चांदीच्या दरात वाढ होतेय. चांदीचे दर 2025 मध्ये सोन्याच्या तुलनेत अधिक वाढलेत. 

Gold Rate Update : आजचा सोन्याचा दर किती?

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एक तोळे सोन्याचा दर 130109 रुपये इतका होता. तर, चांदीचा दर 180701 रुपये प्रति किलो इतका होता. आज एमसीएक्सवर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सहा आठवड्यांचा उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या दरात किरकोळ घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून व्याज दर कपात आणि फेडमधील बदलाची शक्यता, अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमजोर झाल्यानं सोन्याच्या दरात किरकोळ घसरण पाहायला मिळाली. 

आंतरराष्ट्रीय बाजाराता स्पॉट सोन्याची किंमत 0.2 टक्क्यांनी घसरुन  4222.93 डॉलर प्रति औंसवर आली आहे. तर, गेल्या तीन महिन्यात सोन्याच्या दरात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

चांदी 2 लाखांचा टप्पा ओलांडणार

चांदीचे दर 2025 मध्ये दुप्पट झालेले आहेत. एमसीएक्सवर चांदी 1 लाख 80 रुपये किलोवर पोहोचली आहे. 2025 मध्ये चांदी 2 लाखांचा टप्पा पार करणार का याकडे गुंतवणूकदाराचं लक्ष लागलं आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या अपेक्षेनुसार 2026 मध्ये देखील चांदीच्या दरातील तेजी सुरु राहू शकते. चांदीचा जागतिक पुरवठा कमी झाल्यानं आणि औद्योगिक वापर वाढल्यानं चांदीचे दर भारतात 2 लाख  30 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात. 

इंडियन बुलियन अँड  ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 128140 रुपये इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 125070 रुपये इतका आहे. 20 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 114050 रुपयांवर पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 103790 रुपये आहे. तर, 14 कॅरेट सोन्याचा दर 82650 रुपये इतका आहे. 

31 डिसेंबर 2024 ला सोन्याचा दर 75000 रुपयांवर होता. आता सोन्याचा दर 128140 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच सोन्याचा दर 55 हजार रुपयांनी वाढला आहे. तर, चांदीचा दर 31 डिसेंबरला 86000 रुपयांवर होता तो आता 1 लाख 80 हजार रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळं सोने आणि चांदीत गुंतवणूक करणारे मालामाल झाले आहेत.   

युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.

 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

SGB Gold Bond  योजनेमुळं गुंतवणकूदारांवर पैशांचा पाऊस, तब्बल 275 टक्के रिटर्न, आरबीआयकडून परिपत्रक जारी...
SGB Gold Bond  योजनेमुळं पैशांचा पाऊस, गुंतवणकूदारांना मिळणार तब्बल 275 टक्के रिटर्न
How To Create Will : मृत्यूपत्र कसे तयार करायचे? किती खर्च येतो? जाणून घ्या 
How To Create Will : मृत्यूपत्र कसे तयार करायचे? किती खर्च येतो? जाणून घ्या 
1 November Rules Change : 1 नोव्हेंबरपासून काय काय बदलणार? जाणून घ्या.. तुमच्या कामाची गोष्ट
1 November Rules Change : 1 नोव्हेंबरपासून काय काय बदलणार? जाणून घ्या.. तुमच्या कामाची गोष्ट
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट, 1500 रुपये महिलांच्या खात्यात कधी येणार?
लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट, 1500 रुपये महिलांच्या खात्यात कधी येणार?

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MNS : राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, रोषणाई-आतिषबाजी रद्द
राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, शिवाजी पार्कवरील रोषणाई-आतिषबाजी रद्द
मला तुम्हाला भेटायचंय, काही गोष्टी दाखवाच्यात; राम पूर्णेकरांचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली
मला तुम्हाला भेटायचंय, काही गोष्टी दाखवाच्यात; राम पूर्णेकरांचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली
Pune News: वडिलांना डब्बा दिला, घरी जातोय सांगितलं; पाच दिवसांपासून बेपत्ता, अंगावर जखमा नाहीत, मग मृत्यू कसा झाला? सारसबागेजवळील कारमधील मृत तरूणाच्या प्रकरणात नेमकं काय घडलं?
वडिलांना डब्बा दिला, घरी जातोय सांगितलं; पाच दिवसांपासून बेपत्ता, अंगावर जखमा नाहीत, मग मृत्यू कसा झाला? सारसबागेजवळील कारमधील मृत तरूणाच्या प्रकरणात नेमकं काय घडलं?
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
Mumbai Police BDD Chawl Flat : राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
Sanjay Gupta Passes away: संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
SGB Gold Bond  योजनेमुळं गुंतवणकूदारांवर पैशांचा पाऊस, तब्बल 275 टक्के रिटर्न, आरबीआयकडून परिपत्रक जारी...
SGB Gold Bond  योजनेमुळं पैशांचा पाऊस, गुंतवणकूदारांना मिळणार तब्बल 275 टक्के रिटर्न
Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
Embed widget