एक्स्प्लोर

CAS ने विचारले तीन महत्वाचे प्रश्न; चेंडू आता विनेश फोगाटच्या कोर्टात, भारताला रौप्य पदक मिळणार?

Vinesh Phogat: विनेश फोगाटने शानदार कामगिरी करत 50 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली होती.

Vinesh Phogat: भारताची कुस्तीपटू  विनेश फोगटचा (Vinesh Phogat) हिच्या 50 किलो वजनी गटातील अपात्रतेबाबतचा निकाल आंतरराष्ट्रीय क्रीडा कोर्टाने (सीएएस) पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) संपल्यानंतर म्हणजेच 13 ऑगस्टपर्यंत (मंगळवार) राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी सायंकाळी सहापर्यंत याप्रकरणी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

विनेश फोगाटने शानदार कामगिरी करत 50 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यापूर्वी तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. त्यानंतर तिला स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात आले. या निर्णयाविरोधात विनेशने आंतरराष्ट्रीय क्रीडा कोर्टात याचिका दाखल केली होती. विनेशचे अपील स्वीकारण्यात आले. केंद्र सरकारने विनेशची बाजू मांडण्यासाठी अॅड. हरीश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सीएएसने विनेशला विचारले तीन प्रश्न-

विनेश फोगटच्या प्रकरणात अद्याप निर्णय झालेला नाही. पॅरिस ऑलिम्पिक 2024 दरम्यान सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी विनेशला अपात्र ठरवण्यात आले होते. याप्रकरणी विनेशने सीएएसकडे दाद मागितली होती. परंतु सीएएसने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सीएएसने विनेशला ई-मेलद्वारे तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. यातील पहिला प्रश्न, तुला दुसऱ्या दिवशीही वजन करावे लागेल या नियमाची जाणीव होती का? दुसरा प्रश्न रौप्य पदकाशी संबंधित आहे. विनेशला विचारण्यात आले आहे की, क्यूबन कुस्तीपटू तुमच्यासोबत रौप्य पदक शेअर करेल का? आणि तुम्हाला या अपीलचा निर्णय सार्वजनिकपणे जाहीर करायचा आहे की गोपनीय पद्धतीने तो जाहीर करायचा आहे?, असा सवाल विनेशला विचारण्याली माहिती समोर येत आहे.

भारताला एकूण 6 पदके-

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत. 5 कांस्य आणि 1 रौप्य पदके आहेत. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले होते. नेमबाजीत देशाला तीन पदके मिळाली आहेत. हे तिन्ही कांस्य पदके आहेत. कुस्तीतूनही पदक मिळाले आहे. अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदक जिंकले आहे.

विनेशला जगभरातून पाठिंबा

जगभरातील अनेकांनी विनेश फोगाटला पाठिंबा दर्शविला आहे, तसेच काही जणांनी तिला रौप्य पदक देण्याची मागणीही केली आहे. त्यात अमेरिकेचा सहावेळा जगज्जेतेपद पटकावणारा कुस्तीपटू जॉर्डन बुरोज यांचाही समावेश आहे. त्यानी विनेशला पाठिंबा देत तिला रौप्यपदक देण्याची मागणी केली होती. जपानचा सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू रेई हिंगुची यानेही विनेशचे दुःख समजू शकतो असे म्हटले आहे. भारतातून रौप्यपदक विजेता
भालाफेकपटू नीरज चोप्रा, हॉकीपटू पी. आर. श्रीजेश, बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही विनेशला पाठिबा दर्शविला.

सीएएसचं काम कसं चालतं?

पहिलं ऑलिम्पिकमध्ये 1896 मध्ये ग्रीसमध्ये खेळवलं गेलं होतं. मात्र, यानंतर काही वर्षांनी वाद निर्माण झाले होते. काही खेळाडूंनी नियमांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या वादांवर निर्णय घेण्यासाठी 'कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स' ची निर्मिती करण्यात आली होती. सीएएसची स्थापना1984 करण्यात आली होती. याचं मुख्यालय स्वित्झरलँडमध्ये आहे. ही एक स्वायत्त संस्था असून निर्णय स्वतंत्रपण घेत असते.   

संबंधित बातमी:

विनेश फोगाट आहे कोट्यवधींची मालकीण; क्रीडा मंत्रालयाकडूनही मिळतो पगार, एकूण संपत्ती किती?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Embed widget