पॅरिसमध्ये रंगला पॅरालिम्पिकचा उद्घाटन सोहळा; भारताकडून भाग्यश्री जाधव, सुमीत अंतिल ध्वजवाहक
Paris Paralympics 2024: भारतीय भालाफेकपटू सुमित अंतिल आणि महाराष्ट्राची पॅरा ॲथलिट भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक होते.
Paris Paralympics 2024: पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेची फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये शानदार सुरुवात झाली. भारतासह 167 देशांतील खेळाडूंनी परेडमध्ये प्रचंड उत्साह दाखवला. विशेष म्हणजे, खेळांच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन सोहळा स्टेडियमच्या बाहेर चॅम्प्स एलिसीज आणि प्लेस डेला कॉन्कॉर्डवर आयोजित करण्यात आला होता. भारतीय भालाफेकपटू सुमित अंतिल आणि महाराष्ट्राची पॅरा ॲथलिट भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक होते.
TEAM INDIA IN PARALYMPICS. 🇮🇳
— Johns. (@CricCrazyJohns) August 28, 2024
- All the best to everyone & time to make the whole country proud. pic.twitter.com/sJfbasaH6w
भारतीय संघात एकूण 179 सदस्यांचा समावेश-
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा 84 सदस्यीय संघ सहभागी होणार असून त्यात 95 सदस्य देखील त्यांच्यासोबत आहेत. यामध्ये वैयक्तिक प्रशिक्षक आणि सहाय्यकांचाही समावेश आहे जे खेळाडूंच्या विशेष गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासोबत असतात. अशाप्रकारे, भारतीय तुकडीमध्ये एकूण 179 सदस्यांचा समावेश आहे.
कोण आहे भाग्यश्री जाधव?
मूळची महाराष्ट्राची असलेली भाग्यश्री जाधव आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. तिने 2022 आशियाई पॅरा गेम्समध्ये शॉटपुट F34 प्रकारात रौप्य पदक जिंकले आणि टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सातवे स्थान पटकावले. भाग्यश्री जाधवचा खेळातील प्रवास 2017 मध्ये सुरू झाला आणि त्याने लवकरच FEZA वर्ल्ड कप आणि वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स गेम्ससह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून आपला ठसा उमटवला.
भारतीय खेळाडूंकडून विक्रमी पदकांची अपेक्षा-
2021 मध्ये टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने पाच सुवर्णांसह विक्रमी 19 पदके जिंकली होती आणि एकूण क्रमवारीत 24व्या स्थानावर होते. तीन वर्षांनंतर, सुवर्णपदकांची संख्या दुहेरी अंकात नेण्याचे आणि एकूण 25 हून अधिक पदके जिंकण्याचे भारताचे लक्ष्य आहे. भारत यावेळी 12 खेळांमध्ये सहभागी होत आहे, तर टोकियो येथील 54 सदस्यीय पथक नऊ खेळांमध्ये सहभागी झाले होते.
कोणत्या खेळाडूंवर नजर?
विश्वविक्रमाचा मानकरी आणि सुवर्ण विजेता भालाफेकपटू सुवण सुमित सुवर्ण अंतिल (एफ64), टोकियोत आणि कांस्य विजेती अवनी लेखरा रायफल नेमबाज (10 मीटर एअर रायफल एसएच 1), रौप्य आणि कांस्य विजेता सिंहराज अधाना यांना आपापल्या पदकांचा बचाव करायचा आहे. भारताच्या अॅथलेटिक्स पथकात 38 खेळाडू असून, त्यांच्याकडून सर्वाधिक पदके अपेक्षित आहेत. अन्य दावेदारांमध्ये पॅरातिरंदाज शीतल देवी, नेमबाज मनीष नरवाल, बॅडमिंटन खेळाडू कृष्णा नागर, गोळाफेकपटू होकाटो सेमा, रोवर नारायण कोंगनापल्ले आदींचा देखील समावेश आहे. टोकियोत बॅडमिंटन प्रकारात सुवर्ण विजेता प्रमोद भगत हा डोपिंग नियमांच्या उल्लंघनामुळे यंदा पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत टोकियोचा रौप्य विजेता सुहास यतिराज (पुरुष एकेरी तसेच मिश्र दुहेरी) हरविंदरसिंग (तिरंदाजी), भाविनाबेन पटेल (टेटे व्हीलचेअर) हेदेखील पदकाच्या शर्यतीत आहेत.