एक्स्प्लोर
चौकशीच्या अहवालानंतरच शमीबाबत पुढील निर्णय : बीसीसीआय
मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयवर नेमलेल्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटला मोहम्मद शमी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतरच शमीच्या आयपीएल आणि इतर स्पर्धांच्या समावेशाबाबत निर्णय घेण्यात येईल.
अँटी करप्शन युनिटचे अध्यक्ष नीरज कुमार यांना येत्या सात दिवसात या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शमीची पत्नी हसीन जहाँनं शमीवर मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता. या प्रकरणामुळे याआधीच त्याला बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतून वगळण्यात आलं होतं आणि आता आयपीएलमधीलही त्याच्या समावेशावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
आयपीएलच्या अकराव्या मोसमात दिल्ली डेअरडेव्हिल्स संघान तीन कोटीची बोली लावत शमीला आपल्या संघात घेतलं होतं.
दरम्यान, बीसीसीआयची भ्रष्टाचारविरोधी पथक 21 मार्चला शमीचा अहवाल बीसीसीआयकडे सोपवणार आहे. या अहवालानंतर बीसीसीआय शमीबाबत निर्णय घेईल.
संबंधित बातम्या
मोहम्मद शमी चांगला माणूस, महेंद्रसिंग धोनी पाठीशी
दक्षिण आफ्रिकेतील महिलेसोबतही शमीचं अफेअर : हसीन जहां
कोट्यवधींच्या 'हसीन फार्म हाऊस'चा वाद शमीला नडला?
पहिलं लग्न ते चीअर लीडर, शमीची पत्नी हसीनची कहाणी
पत्नीच्या सर्व आरोपांवर मोहम्मद शमीचं उत्तर, EXCLUSIVE मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement