एक्स्प्लोर
धोनीच्या 'त्या' एका सल्ल्यामुळे श्रेयस अय्यरचं आयुष्य बदललं!
ड्रेसिंग रुममध्ये नवीन असताना श्रेयस अय्यरला धोनीने एक सल्ला दिला होता, ज्याची अंमलबजावणी श्रेयसने केली आणि त्याला त्याचे चांगले परिणामही पाहायला मिळाले.
मुंबई : टीम इंडियाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने त्याच्या करिअरमधील काही खास किस्से शेअर केले आहेत. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि वन डे संघाचा यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या एका सल्ल्यामुळे आपलं आयुष्य बदललं, असा खुलासा श्रेयसने केला.
धोनीच्या त्या सल्ल्यामुळे संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित करण्यास मदत मिळाली, असं श्रेयसने सांगितलं. आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरच्या खांद्यावर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती. त्याने यशस्वीपणे संघाचं नेतृत्त्व करत शानदार फलंदाजीही केली होती. त्याने एका टॉक शोमध्ये काही किस्से शेअर केले आहेत.
''वृत्तपत्रांपासून दूर राहा आणि सोशल मीडियावर जास्त वेळ खर्च करु नको, असा सल्ला धोनीने दिला होता. ड्रेसिंग रुममध्ये नवीन असताना धोनीने हा अमूल्य सल्ला दिला, ज्यामुळे क्रिकेटवर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यास मदत झाली,'' असं श्रेयसने सांगितलं.
श्रेयसने एका मैत्रिणीचाही किस्सा सांगितला. ''आयपीएल लिलावाची बातमी समजताच त्या मुलीने मेसेज पाठवणं सुरु केलं. एवढे मेसेज का करते, असं तिला विचारलं तर ती म्हणाली, ‘मी तुझ्यासाठी खुश आहे’. पण नंतर मला समजलं, की ती माझ्या नाही, तर माझ्या पैशाच्या मागे आहे,'' असंही श्रेयसने सांगितलं.
श्रेयसने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली. त्याने 14 सामन्यांमध्ये 132 च्या स्ट्राईक रेटने 411 धावा केल्या. मात्र त्याच्या या खेळीनेही दिल्लीला सावरता आलं नाही.
श्रेयने आतापर्यंत भारतीय संघाकडून सहा वन डे सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 42 च्या सरासरीने 210 धावा केल्या, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. श्रेयसने सहा टी-20 मध्ये 16.6 च्या सरासरीने एकूण 83 धावा केल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement