एक्स्प्लोर

धोनीने सांगितलं होतं, चेंडू बघ आणि मग मार : शार्दूल ठाकूर

ड्यू प्लेसीसने एक खिंड लढवून चेन्नईला सनसनाटी विजय मिळवून दिला. त्याला खऱ्या अर्थाने साथ दिली, ती शार्दूल ठाकूरने. नशिबानेही शार्दूलला साथ दिली आणि चेन्नईच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

मुंबई : चेन्नई सुपरकिंग्जने सनरायझर्स हैदराबादचा दोन विकेट्सनी पराभव करून आयपीएलच्या क्लालिफायर वनचा सामना जिंकला. या विजयाने चेन्नईला आयपीएलच्या फायनलचं तिकीट मिळवून दिलं. चेन्नईच्या या विजयात फॅफ ड्यू प्लेसीसची नाबाद 67 धावांची खेळी निर्णायक ठरली. ड्यू प्लेसीसने 42 चेंडूंमधली ही खेळी पाच चौकार आणि चार षटकारांनी सजवली. शेन वॉटसनच्या साथीने ड्यू प्लेसी सलामीला मैदानात उतरला होता. दुसऱ्या बाजूने चेन्नईची आठ बाद 113 अशी घसरगुंडी उडाली. पण ड्यू प्लेसीसने एक खिंड लढवून चेन्नईला सनसनाटी विजय मिळवून दिला. त्याला खऱ्या अर्थाने साथ दिली, ती शार्दूल ठाकूरने. नशिबानेही शार्दूलला साथ दिली आणि चेन्नईच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. शार्दूलने पाच चेंडूंमध्ये नाबाद 15 धावा केल्या, ज्यामध्ये तीन चौकारांचा समावेश होता. ''धोनीने सांगितलं होतं, चेंडू पाहा आणि मग मार'' शार्दूल ठाकूरने या खेळीचं श्रेय कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिलं. ''ही एक चांगली संधी होती आणि संघासाठी धावा करण्याची गरज होती. जेणेकरुन फाफ डू प्लेसिसला साथ मिळेल. कारण, तो सेट झालेला होता. प्रशिक्षकांनीही सांगितलं होतं, की तू फलंदाजी करु शकतोस. पुण्याकडून खेळताना फलंदाजीची संधी आलेली असल्यामुळे अनुभव होताच. मैदानात उतरतानाच धोनीने सांगितलं, की चेंडू पाहा आणि मग मार. त्याप्रमाणेच केलं, शिवाय प्लेसिससोबतही चर्चा झाली होती. त्याने मला एक धाव काढून स्ट्राईक द्यायला सांगितली होती. मात्र त्यापेक्षाही चांगलं घडलं,'' असं शार्दूलने सामन्यानंतर बोलताना सांगितलं. एकोणिसाव्या षटकात काय घडलं? शार्दूल ठाकूर 19 व्या षटकात फलंदाजीसाठी आला तेव्हा समोर सिद्धार्थ कौल गोलंदाजीसाठी होता. एक धाव काढून प्लेसिसला स्ट्राईक देण्याच्या विचारात शार्दूल होता, मात्र पहिल्याच चेंडूवर चौकार गेला. दुसऱ्या चेंडूवरही शार्दूल थोडक्यात बचावला आणि यष्टिरक्षकाच्या मागे तो चेंडू चौकार गेला. तिसऱ्या चेंडूवर शार्दूलने एक धाव काढून प्लेसिसला स्ट्राईक दिली. चौथा चेंडू सिद्धार्थ कौलने वाईड टाकला. त्यानंतरच्या चेंडूवर प्लेसिसने पुन्हा एक धाव काढली आणि शार्दूल स्ट्राईकवर आला. पाचव्या चेंडूवर दोन धावा काढून शार्दूलच स्ट्राईकवर राहिला. मात्र अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकला आणि एकाच षटकात दोघांनी मिळून 15 धावा जमवल्या. या षटकात 15 धावा कुटल्यामुळे चेन्नईला विजयासाठी अखेरच्या सहा चेंडूमध्ये केवळ सहाच धावांची गरज होती आणि गोलंदाजीसाठी समोर भुवनेश्वर कुमार उभा होता. मात्र स्ट्राईकवर असलेल्या प्लेसिसने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत चेन्नईचं फायनलचं तिकीट बूक केलं. संबंधित बातमी :

ब्राव्होचा धोनीसमोर बेभान डान्स, हरभजनचीही साथ

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Record : ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
IND vs NZ 1st ODI : पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
IND vs NZ 1st ODI Score : वनडे मालिकेतही टीम इंडियाची विजयी सलामी! न्यूझीलंडचा 5 विकेट्सनं पराभव
IND vs NZ 1st ODI : वनडे मालिकेतही टीम इंडियाची विजयी सलामी! न्यूझीलंडचा 5 विकेट्सनं पराभव
IND vs NZ 1st ODI : 6 चेंडूंचा ड्रामा! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत तीन वर्षांनंतर रोहित शर्मासोबत नको ते घडलं, सगळेच शॉक
6 चेंडूंचा ड्रामा! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत तीन वर्षांनंतर रोहित शर्मासोबत नको ते घडलं, सगळेच शॉक

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
Devendra Fadnavis: दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
Embed widget