एक्स्प्लोर
आयपीएल 2017 : धोनीला पुणे सुपरजायंट्सच्या कर्णधारपदावरुन हटवलं!
मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला आयपीएल टीम रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं आहे. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आल्याची माहिती आहे.
धोनीने आयपीएलच्या नवव्या मोसमात पुणे सुपरजायंट्सचं कर्णधारपद भुषवलं होतं.
यापूर्वी स्मिथने राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं आहे, तर धोनीकडे चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाची धुरा होती. मात्र दोन्ही संघांवर मॅच फिक्सिंग प्रकरणात बंदी घालण्यात आली आहे.
आयपीएलच्या नवव्या मोसमात धोनीच्या नेतृत्वात पुणे सुपरजायंट्सने निराशाजनक कामगिरी केली होती. एकूण 17 सामन्यांपैकी पुणे सुपरजायंट्सने केवळ पाच सामन्यात विजय मिळवला होता.
धोनीचा आयपीएल-9 मधील खराब फॉर्म, हे देखील त्याला कर्णधारपदावरुन हटवण्यामागचं कारण असल्याचं बोललं जात आहे. त्याने आयपीएल-9 मध्ये 12 इनिंगमध्ये केवळ 284 धावा केल्या होत्या. यामध्ये एका अर्धशतकी खेळीचा समावेश होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement