एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये खेळणार का? धोनी म्हणतो...
आयपीएल क्लोझिंग सेरेमनीदरम्यान अँकरने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला विचारले की, तू पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळणार का?
हैदराबाद : आयपीएलच्या 12 व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या एका धावेने पराभव करून आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. हैदराबादच्या रणांगणात मुंबईने अक्षरशः चेन्नईच्या तोंडचा घास हिरावला.
सामन्यानंतर आयपीएल क्लोझिंग सेरेमनीदरम्यान अँकरने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला विचारले की, तू पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळणार का? यावर धोनी म्हणाला की, "पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलबद्दल आत्ताच बोलायला नको. सध्या आम्ही केवळ क्रिकेट विश्वचषकाचा विचार करत आहोत."
धोनी म्हणाला की, "पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलबाबत आत्ताच कोणतीही भविष्यवाणी करण्याला काही अर्थ नाही. सध्या आम्ही सर्वजण विश्वचषकाबाबतच विचार करत आहोत. त्यानंतर आपण चेन्नई सुपरकिंग्सबद्दल बोलू. परंतु मला आशा आहे की, पुढच्या वर्षी आपण पुन्हा भेटू." धोनीच्या या विधानामुळे तो पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळणार, असा अंदाज धोनीच्या फॅन्सनी लावला आहे. त्यामुळे धोनीचे चाहते खूश आहेत.
IPL 2019 : विजेत्याला मिळाले "इतके' कोटी, उपविजेता संघदेखील मालामाल
दरम्यान रविवारी झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला विजयासाठी 150 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेला चेन्नईचा संघ केवळ 148 धावांपर्यंतच मजल मारु शकला. चेन्नईवर अवघ्या एका धावेने विजय मिळवत आयपीएलच्या इतिहासात मुंबईच्या संघाने चौथ्यांदा चषक उंचावला. या सामन्यात धोनी फलंदाजीमध्ये सपशेल अपयशी ठरला. त्याने 8 चेंडूत केवळ 2 धावा केल्या.
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
कोल्हापूर
Advertisement