एक्स्प्लोर
विश्वचषक जिंकला त्याच दिवशी धोनीचा 'पद्मभूषण'ने सन्मान!
महेंद्रसिंग धोनीला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. पद्मभूषण हा देशातला तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो.

नवी दिल्ली : टीम इंडियाला ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डेचाही विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. पद्मभूषण हा देशातला तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो.
आज दिनांक 2 एप्रिल 2018. टीम इंडियाच्या दुसऱ्या विश्वचषक विजयाला आज सात वर्षे झाली, पण भारतीय क्रिकेटरसिकांच्या मनातल्या त्या ऐतिहासिक फायनलच्या आठवणी आजही ताज्या आहेत.
महेंद्रसिंग धोनीने नुवान कुलशेखराच्या चेंडूवर ठोकलेल्या विजयी षटकाराने टीम इंडियाच्या त्या विश्वचषक विजयावर शिक्कामोर्तब केलं. वानखेडे स्टेडियमवरच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला होता.
ऐतिहासिक क्षणाचा व्हिडीओ :
First Indian citizen to go to space and first Indian citizen to launch a cricket ball into the orbit to lift the 🏆 - #ThisDayThatYear #RakeshSharma #MSDhoni pic.twitter.com/8zaj6afYjs
— BCCI (@BCCI) April 2, 2018
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























