एक्स्प्लोर
बर्थ डे बॉय कॅप्टन कूल धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 07 Jul 2016 06:28 PM (IST)
1/8

धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसीचे तीन मोठे टूर्नामेंट जिंकले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007चा टी 20 विश्व चषक, 2011 सालातील एक दिवसीय सामन्यांचा विश्व चषक जिंकला होता.
2/8

सुरेश रैनाने धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, कॅप्टन कूलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत धोनी बासरी वाजवताना पाहायला मिळत आहे. ''येणाऱ्या प्रत्येक वर्षात तुझी उत्तम कामगिरी आणि भरभराट होवो हीच शुभेच्छा''
3/8

बिग बी अमिताभ बच्चन यांनीही धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. ''हॅपी बर्थडे एमएस''
4/8

आयसीसीनेही धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आयसीसीच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून शुभेच्छा दिल्या आहेत. ''सर्वकाळातील महान कर्णधार, उत्तम फलंदाज, आणि उत्कृष्ट विकेटकीपर महेंद्र धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.''
5/8

सेहवागनेही कॅप्टन कूलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, सेहवागने मिश्किल अंदाजात शुभेच्छा देताना धोनीच्या 'हॅलिकॉप्टर शॉट'चा संदर्भ देऊन 7 जुलै हा दिवस 'राष्ट्रीय हॉलिकॉप्टर दिवस' म्हणून घोषित करण्याची मागणीच केली आहे. सेहवागने आपल्या ट्विटमध्ये ''वाढदिवसाच्या शुभेच्छा, आप अनहोनी को होनी करते रहो,'' अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.
6/8

लंडनमधील गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर सचिन तेंडुलकर विश्रांती घेत आहे. मात्र, सचिनने ट्विटरवरून धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. ''वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष तुझ्यासाठी चांगले आणि आनंद देणारे असो,'' असे सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
7/8

धोनीच्या जुन्या सहकार्यांपैकी सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्यासोबतच बॉलीवूड अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांनीही धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
8/8

भारताचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी आज वयाच्या 35 व्या वर्षात पदार्पण करत आहे. धोनीच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयचे आध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यापासून ते त्याचे सर्व सहकारी आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Published at : 07 Jul 2016 06:28 PM (IST)
Sponsored Links by Taboola
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीसीसीआयला बसला मोठा धक्का! ज्या खुर्चीसाठी रांग लागते, तीच ऑफर 100 कसोटी खेळलेल्या दिग्गजांनी लाथाडली; क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ
क्रीडा
अर्शदीपच्या जिवावर उठला होता वेस्ट इंडिजचा गोलंदाज?, टीम इंडियाच्या शेवटच्या षटकात हाय-व्होल्टेज ड्रामा, श्रेयसने थेट डावच केला घोषित, नेमकं काय घडलं?
क्रीडा
8 महिन्यांत, 3 वेळा दुखापत; तरीही गंभीरच्या लाडक्याची वनडेत होणार सरप्राईज कमबॅक?, KKRच्या 'या' वाघावर BCCI एवढी मेहेरबान कशासाठी?
क्रीडा
वैभवचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला; संजूसोबत त्याला सलामीला पाठवा, माजी क्रिकेटपटू संतापले, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला सुनावलं






















