एक्स्प्लोर
वादांना मागे टाकत मोहम्मद शमी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात!
कोलकाता पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे शमीवर आता अटकेची टांगती तलवार आहे. मात्र अशा परिस्थितीतही तो क्रिकेटच्या मैदानात दिसून आला.
मुंबई : पत्नीच्या आरोपांनंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अडचणीत आला. कोलकाता पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे शमीवर आता अटकेची टांगती तलवार आहे. मात्र अशा परिस्थितीतही तो क्रिकेटच्या मैदानात दिसून आला.
सर्व वादांना मागे टाकत त्याने पुन्हा एकदा तयारी सुरु केली आहे. आयपीएलच्या अकराव्या मोसमात तो दिल्ली डेअरडेव्हिल्सचं प्रतिनिधित्व करणार आहे. या मोसमाची सुरुवात 7 एप्रिलपासून होत आहे. त्यामुळे आयपीएलच्या तयारीसाठी मोहम्मद शमीकडे अत्यंत कमी कालावधी उरला आहे.
या परिस्थितीमध्येही क्रिकेटच्या मैदानात उतरुन त्याने पुन्हा एकदा तयारी सुरु केली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मोहम्मद शमी गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. शमीची पत्नी हसीन जहाने त्याच्यावर कौटुंबीक अत्याचारासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. शमीचे इतर तरुणींशी शारीरिक संबंध आहेत, याची तक्रारही तिने केली. शिवाय शमीवर तिने मॅच फिक्सिंगचा आरोपही केला. या घटनेनंतर बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून शमीचं नाव वगळलं. तर आयपीएलमधील त्याच्या सहभागाबाबतही प्रश्नचिन्ह कायम आहे. कारण, दिल्ली डेअरडेव्हिल्स लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालानंतर निर्णय घेणार आहे.#Ghaziabad:@MdShami11 के जज़्बे को सलाम ।इतनी विपरीत परिस्थितियों में भी नहीं दे रहे है प्रैक्टिस को विराम।@BCCI @samachar_plus @abpnewstv @News18UP @Indianewsup pic.twitter.com/L9rdfpOmL1
— NiwanTimes (@NiwanTimesInd) March 19, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement