एक्स्प्लोर
Advertisement
शमीला दिलासा... BCCIकडून क्लीन चिट, कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतही स्थान
बीसीसीआयनं मोहम्मद शमीला मॅच फिक्सिंगच्या आरोपातून क्लीन चिट दिली आहे. तसंच त्याला बीसीसीआयच्या कॉन्ट्र्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतही स्थान देण्यात आलं आहे.
मुंबई : पत्नीसोबत सुरु असलेल्या वादादरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला मोठा दिलासा मिळाला आहे. बीसीसीआयनं शमीला मॅच फिक्सिंगच्या आरोपातून क्लीन चिट दिली आहे. तसंच त्याला बीसीसीआयच्या कॉन्ट्र्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतही स्थान देण्यात आलं आहे.
शमीच्या चौकशीसाठी बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चौकशीअंती अँटी करप्शन युनिटने शमीला क्लीन चिट दिली आहे. तसंच त्याला बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बी श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता शमीला 3 कोटीचं मानधन मिळणार आहे.
शमीची पत्नी हसीन जहां हिने शमीवर मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले होते. हसीनने असाही दावा केला होता की, लंडनमध्ये राहणाऱ्या मोहम्मद भाई आणि पाकिस्तानी तरुणी अलिश्बा यांच्यासोबत शमीचे पैशाचे व्यवहार होते.
या प्रकरणातील गंभीरता लक्षात घेत बीसीसीआयने शमीला कॉन्ट्रॅक्ट यादीतून वगळलं होतं आणि त्याच्या चौकशीसाठी अॅण्टी करप्शन युनिट स्थापन करण्यात आलं होतं. या संपूर्ण प्रकरणी अॅण्टी करप्शन युनिटने शमीच्या पत्नीचीही चौकशी केल होती. पण आता शमीला क्लीन चिट मिळाल्यामुळे त्याचा भारतीय संघात आणि आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
6 मार्चला मोहम्मद शमीवर त्याच्या पत्नीने सोशल मीडियाच्या माध्यमातून गंभीर आरोप केले होते. तसंच तिने कोलकातामध्ये शमी आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात तक्रारही नोंदवली होती.
संबंधित बातम्या
बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून शमीला क्लीन चिट : सूत्र
शमीवरील आरोप बिनबुडाचे, पाकिस्तानी तरुणी आलिश्बाचा दावा
बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी टीमकडून हसीन जहांचीही चौकशी
मोहम्मद शमी चांगला माणूस, महेंद्रसिंग धोनी पाठीशी
कोट्यवधींच्या 'हसीन फार्म हाऊस'चा वाद शमीला नडला?
दक्षिण आफ्रिकेतील महिलेसोबतही शमीचं अफेअर : हसीन जहां
फोन हरवल्यापासून शमी चांगलं वागायला लागला : हसीन जहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
नागपूर
Advertisement