एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयपीएलच्या रणसंग्रामात सेहवागच्या भाच्याची एंट्री
वीरेंद्र सेहवागचा भाचा मयंक डागर याला किंग्स इलेव्हन पंजाबने 20 लाख रुपयात खरेदी केलं आहे.
मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मौसमाचा लिलाव नुकताच पार पडला. यावेळी अनेक खेळाडू अनसोल्ड राहिले. तर काही खेळाडूंना अगदी शेवटच्या क्षणी खरेदी करण्यात आलं. अशाच एका खेळाडूला किंग्स इलेव्हन पंजाबने खरेदी केलं आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
मयंक डागर असं या खेळाडूचं नाव असून त्याला पंजाबने 20 लाख रुपयात खरेदी केलं आहे. मयंकने अंडर-19 आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या खेळाने सर्वानाच प्रभावित केलं आहे. पण त्यानंतरही मयंक आयपीएल लिलावात अनसोल्डच होता. पण शेवटच्या क्षणी मयंकला पंजाबने त्याच्या बेस प्राइजमध्ये खरेदी केलं.
पंजाबचा मेन्टॉर वीरेंद्र सेहवागने मयंकची कामगिरी लक्षात घेत त्याला संघात स्थान दिलं. याशिवाय मयंक सेहवागचा भाचाही आहे.
दरम्यान, मयंक आपल्या खेळाशिवाय हॅण्डसम लूकमुळेही बराच चर्चेत असतो. सोशल मीडियावर मयंकचे फॉलोअर्सही बरेच आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे 75 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement