एक्स्प्लोर
Advertisement
IPL च्या अंतिम सामन्याचं मराठीत समालोचन
क्रिकेटच्या मराठमोळ्या चाहत्यांना 27 मे रोजी या सामन्याचं मराठी समालोचन पाहता येणार आहे, तेसुद्धा अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत.
मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील अंतिम फेरीचे दावेदार कोण ठरणार आणि कोणता संघ विजेतेपदाची ट्रॉफी उंचावणार याची प्रचंड उत्सुकता क्रीडा रसिकांना आहे. क्रिकेटच्या मराठमोळ्या चाहत्यांना 27 मे रोजी या सामन्याचं मराठी समालोचन पाहता येणार आहे, तेसुद्धा अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत.
मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचा अंतिम सामना मराठी समालोचनासह पाहता येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर VIVO IPLचा 27 मे रोजी होणारा अंतिम सामना पाहता येणार आहे.
विशेष म्हणजे अंतिम सामन्याच्या आधी होणाऱ्या खास कार्यक्रमात माधुरी दीक्षित आणि अभिनेता स्वप्नील जोशी सहभागी होणार आहेत. त्यानंतर मराठी समालोचनासह अंतिम सामन्याचा आनंद घेता येईल. संदीप पाटील, सुनंदन लेले आणि चंद्रकांत पंडीत यांच्या खुमासदार शैलीने अंतिम सामन्याची रंगत वाढणार आहे.
मराठी भाषा आणि क्रिकेट या दोन्हीला प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जागा आहे. IPL 2018 च्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने या दोन्ही गोष्टी एकत्र येणार असल्यामुळे त्याचा भाग होण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. मराठी माणसांना पहिल्यांदा क्रिकेट सामन्याचं समालोचन मराठीतून ऐकण्याची संधी मिळणार आहे. क्रिकेट आणि मराठी भाषेच्या जल्लोषात प्रेक्षकही नक्की सहभागी होतील, अशी खात्री स्वप्नील जोशीनं व्यक्त केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement