महाराष्ट्र केसरीचं बिगुल वाजलं, पहिला दिवस पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या पैलवानांचा
पुण्यात महाराष्ट्र शासनाच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या 63 व्या पर्वाचं आज बिगुल आज वाजलं.
पुणे : पुण्यात महाराष्ट्र शासनाच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या 63 व्या पर्वाचं आज बिगुल आज वाजलं. आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन पार पडलं. यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या मातीतल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतल्या मुख्य कुस्त्यांना उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढचे पाच दिवस माती आणि मॅटवरच्या कुस्त्यांचा थरार महाराष्ट्रातल्या कुस्तीप्रेमींना अनुभवता येणार आहे. त्यानंतर सात जानेवारीला मॅट आणि माती विभागातील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबासाठीची लढत होईल.
आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या पैलवानांची तीन पदकांची सलामी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी काका पवार यांच्या पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या पैलवानांनी वर्चस्व गाजवलं. 57 किलो माती विभागात आबासाहेब आटकळेनं सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने अंतिम सामन्यात मूळच्या कोल्हापूरच्या पण आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा पैलवान असलेल्या संतोष हिरुगडेचं आव्हान मोडीत काढलं. संतोषला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. तर 79 किलो माती विभागात धर्मा शिंदेनं कांस्यपदकाची कमाई केली.
महाराष्ट्र केसरीच्या 79 किलो माती विभागात उस्मानाबादच्या हणुमंत पुरीनं बाजी मारली. हणुमंतने सोलापूरच्या सागर चौगुलेचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. तर सागरला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. सुवर्णविजेता हणुमंत हा मूळचा उस्मानाबादचा असला तरी तो सध्या पुण्याच्या मामासाहेब मोहोळ केंद्राचा पैलवान आहे. तिथे तो वस्ताद ज्ञानेश्वर मांगडेंच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
काँग्रेसवर यावेळी रणजीत सावरकर यांनी जोरदार शब्दांत हल्ला चढवला. काँग्रेसने सावरकरद्वेषातून आज अत्यंत हीन पातळी गाठली असून यासाठी राहुल गांधी व काँग्रेस सेवादलासह सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस सेवादलाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही रणजीत सावरकर यांनी केली.