एक्स्प्लोर
Advertisement
IndvsAus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांत आटोपला
धर्मशाला : भारताचा नवोदित फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या धडाकेबाज गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव पहिल्याच दिवशी 300 धावांत आटोपला.
पदार्पणाच्या कसोटीत कुलदीप यादवने 4 विकेट्स घेतल्या. तर उमेश यादवने 2 तर अश्विन, जाडेजा आणि भुवनेश्वरने प्रत्येक 1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्हने सर्वाधिक 111 तर विकेटकिपर मॅथ्यू वेडने 57 धावा केल्या.
धर्मशाला कसोटीत नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. उमेश यादवने मॅट रेनशॉची त्रिफळा उडवून कांगारुंना पहिला धक्का दिला. रेनशॉ अवघी 1 धाव करुन माघारी परतला.
त्यानंतर आलेल्या कर्णधार स्टीव्हने खेळाची सूत्रं हाती घेऊन भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केलं. स्मिथ- वॉर्नर या जोडीने शतकी भागादारी रचली. या जोडीने ऑस्ट्रेलियाला उपहारापर्यंत 1 बाद 131 अशी मजल मारुन दिली.
या जोडीने भारतीय गोलंदाजीवर आक्रमण करुन धावसंख्या वेगाने वाढवली. मात्र उपहारानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अक्षरश: नाचवलं.
उपाहारानंतर सलामीवीर डेव्हिड वॉर्नरपाठोपाठ शॉन मार्शही तातडीने माघारी परतला. फिरकीपटू कुलदीप यादवने वॉर्नरच्या रुपाने कसोटीतील पहिली विकेट आपल्या नावे केली आणि ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. वॉर्नर 56 धावा करुन माघारी परतला.
त्यानंतर उमेश यादवने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. शॉन मार्श 4 धावा करुन माघारी परतला. तर अश्विननं शतकवीर स्मिथची झुंज मोडून काढली.स्मिथ 111 धावा करुन माघारी परतला.
मग कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का दिला. यादवने कमिन्स (21) ला माघारी धाडत सातवी विकेट घेतली. कुलदीपची ही चौथी विकेट ठरली.
त्यानंतर ओकिफ, मॅथ्यू वेड आणि नॅथन लायनला झटपट माघारी धाडत, भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 300 धावांत गुंडाळला.
LIVE UPDATE
- ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. कसोटी पदार्पण करणाऱ्या फिरकीपटू कुलदीप यादवने दमदार गोलंदाजी केली. कुलदीपने हॅण्डस्कोम्बपाठोपाठ मॅक्सवेलच्याही त्रिफळा उडवल्या. हॅण्डस्कोम्ब आणि मॅक्सवेल दोघांनीही प्रत्येकी 8 धावा केल्या. कुलदीपची ही तिसरी विकेट होती.
- मॅक्सवेल बाद झाला त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 बाद 178 अशी होती.
- उपहारापूर्वी खणखणीत फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला, भारतीय गोलंदाजांनी चांगलेच दणके दिले. ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज तंबूत परतले आहेत.
- उमेश यादव आणि पदार्पण करणारा कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
- कुलदीप यादवने हॅण्डस्कोम्बला (8) माघारी धाडून भारताला चौथं यश मिळवून दिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement