KKR vs RR: आयपीएलमध्ये कोलकाता - राजस्थान सामना; अशी असेल प्लेईंग इलेव्हन
आयपीएलच्या इतिहासात कोलकाता आणि राजस्थानमध्ये कायम अटीतटीचा सामना पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत हे दोन्ही संघ 23 वेळा आमने सामने आले आहे.
Kolkata vs Rajasthan :आयपीएलमध्ये आज संध्याकाळी 54 वा सामना खेळला जाईल. आजचा सामना इयॉन मॉर्गनचा कोलकाता नाइट राइडर्स आणि संजू सॅमसनचा राजस्थान रॉयल्स या दोन संघात खेळवण्यात येणार आहे. ही मॅच शारजाह येथे संध्याकाळी साडे सात वाजता खेळवण्यात येणार आहे. प्लेऑफचा विचार करता हा सामना कोलकातासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे आज संघासाठी 'करो या मरो' अशी स्थिती आहे.
आयपीएलच्या इतिहासात कोलकाता आणि राजस्थानमध्ये कायम अटीतटीचा सामना पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत हे दोन्ही संघ 23 वेळा आमने सामने आले आहे. त्यापैकी कोलकाताने 12 सामने जिंकले आहे. तर राजस्थानने 11 सामने जिंकले आहे. त्यामुळे आजचा सामना देखील अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.
आईपीएल 2021च्या पहिल्या हाफमध्ये जेव्हा हे संघ आमनेसामने आले होते त्यामुळे संजू सॅमसनच्या टीमने बाजी मारली होती. त्या सामन्यात कोलकाताने पहिल्यांदा फलंदाजी करत 133 धावा केल्या होत्या. तर राजस्थानने हे आव्हान 19 षटकात चार विकेट गमावत सहजपणे हा सामना जिंकला होता. राजस्थानसाठी कर्णधार संजू सॅमसनने नाबाद 42 धावा केल्या होत्या.
कोलकाताचे संभाव्य Playing 11 - शुभमन गिल, वेंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयोन मोर्गन (कर्णधार), शाकिब अल हसन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुनील नारेन, शिवम मावी, टिम साउथी आणि वरुण चक्रवर्ती
राजस्थानचे संभाव्य Playing 11 - एविन लुईस, यशस्वी जायसवाल, संजू सैमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), शिवम दुबे, ग्लेन फिलिप्स, लियाम लिविंगस्टोन, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, मुस्तफिजुर रहमान और चेतन सकारिया