Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीनं जसप्रीत बुमराहला पहिल्या बॉलवर षटकार मारला पण बाद होताच डोळ्यात पाणी, बॅट आपटली, व्हिडिओ समोर
Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीनं मुंबई इंडियन्स विरुद्ध जोरदार फलंदाजी केल्याचं पाहायला मिळालं. बाद झाल्यानंतर मैदान सोडताना त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं.

Vaibhav Sooryavanshi Emotional Video गुवाहाटी: आयपीएलमध्ये काल राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स आमने सामने आले होते. पावसामुळं हा सामना 11-11 ओव्हरचा खेळवण्यात आला. या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यानं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो मुंबईला चांगलाच महागात पडला. कारण, राजस्थानचे सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. 14 बॉलमध्ये 39 धावा करुन बाद झालेल्या वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात मैदानाबाहेर जाताना पाणी आल्याचं दिसून आलं. याशिवाय वैभव मैदानावर बॅट आपटत असल्याचं देखील पाहायला मिळतं. वैभव सूर्यवंशीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं. आहे.
वैभव सूर्यवंशीनं मुंबई इंडियन्स विरुद्ध दमदार फलंदाजी केली. त्यानं 14 बॉलमध्ये 1 चौकार आणि 5 षटकार मारत 39 धावा केल्या. कालच्या मॅचनंतर सोशल मीडियावर एख व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जात असताना त्याच्या डोळ्यात पाणी दिसून आलं. यावेळी तो रागानं बॅट जमिनीवर आपटत असल्याचं पाहायला मिळतं.
ये सच में बच्चा है
— Rakesh 2.0 🇮🇳 (@TheRakesh_IND) April 8, 2026
पहले सामने वाले बॉलर को छक्के और छक्के मारकर रुलाता हे फिर आउट होने पर खुद रोता
हाथी घोड़े पालकी खेलने की उम्र में वर्ल्ड बेस्ट
बॉलर के जज्बात से खेलता है
बच्चा है दो बार बैटिंग तो देनी चाहिए 😅 pic.twitter.com/9ql7MZYCvk
बुमराहला पहिल्या बॉलवर षटकार मारला
वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह या मॅचमध्ये आमने सामने आले. वैभव सूर्यवंशीनं जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा पहिला बॉल खेळत असताना षटकार मारला. यानंतर वैभव सूर्यवंशीनं आणखी एक षटकार मारला. म्हणजेच वैभवनं बुमराहला दोन षटकार मारले.
पावसामुळं मुंबई राजस्थान सामना 11-11 ओव्हरचा
आयपीएलच्या 19 व्या हंगामातील 13 वी मॅच गुवाहाटीत खेळवण्यात आली. मात्र, पावसामुळं मॅच सुरु होण्यास उशीर झाला. पावसामुळं मॅच 11-11 ओव्हरची खेळवण्यात आली. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या राजस्थाननं 11 ओव्हरमध्ये 3 विकेटवर 150 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीनं 39 धावा केल्या. तर, यशस्वी जयस्वालनं 32 बॉलमध्ये 77 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या मुंबईचा संघ 11 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 123 धावा करु शकला. यामुळं राजस्थाननं 27 धावांनी विजय मिळवला.
दरम्यान, मुंबईवरील विजयानंतर राजस्थान रॉयल्सनं गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर, पहिल्या स्थानावर नेट रनरेटच्या जोरावर आरसीबी पहिल्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स तिसऱ्या तर पंजाब किंग्ज चौथ्या स्थानावर आहे.




















