KKR : कोलकाता नाइट रायडर्ससाठी गुड न्यूज, ऑस्ट्रेलियातून मिळाली मोठी अपडेट, थेट कॅमेरुन ग्रीनचा व्हिडिओ शेअर केला
Cameron Green KKR IPL 2026: कोलकाता नाइट रायडर्सची आयपीएलमधील पहिल्या तीन सामन्यात कामगिरी खराब झालेली आहे. आता केकेआर आणि लखनौ सुपर जायंटस उद्या आमने सामने येतील.

Cameron Green Bowling कोलकाता : आयपीएलच्या 19 व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. तीनवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावणाऱ्या केकेआरची सुरुवात खराब झाली आहे. उद्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंटस आमने सामने येणार आहेत. या मॅचपूर्वी केकेआरला दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं कॅमेरुन ग्रीनला आयपीएलमध्ये गोलंदाजी करण्यास परवानगी दिली आहे. यामुळं केकेआरला मोठा दिलासा मिळाला आहे.
केकेआरनं 25 कोटी रुपये मोजून कॅमेरुन ग्रीनला संघात घेतलं होतं. मात्र, दोन डावात कॅमेरुन ग्रीन चांगली फलंदाजी करु शकला नाही. तर, क्रिकेट ऑस्ट्रेलियाची परवानगी नसल्यानं कॅमेरुन ग्रीनला परवानगी देण्यात आली नव्हती, त्यामुळं तो गोलंदाजी करु शकत नव्हता. याबाबत केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे यानं स्पष्टपणे भूमिका मांडली होती. कॅमेरुन ग्रीननं दोन डावात 24 धावा केल्या आहेत. यामुळं केकेआरचा सर्वात महागडा खेळाडू कॅमेरुन ग्रीन टीकाकारांच्या निशाण्यावर आला होता.
केकेआरसाठी गुड न्यूज
केकेआरला आयपीएलच्या 19 व्या हंगामात एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. केकेआरसाठी चांगली बातमी म्हणजेच कॅमेरुन ग्रीनला गोलंदाजी करण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मंजुरी मिळाली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं कॅमेरुन ग्रीनला फिटनेस क्लिअरन्स दिला आहे आणि यासंदर्भातील माहिती केकेआर व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. कॅमेरुन ग्रीननं सुरुवातीच्या सामन्यांमध्ये गोलंदाजी केली नव्हती.
कोलकाता नाइट रायडर्सच्या टीमनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये कॅमेरुन ग्रीन गोलंदाजीचा सराव करताना पाहायला मिळतोय. नेटमध्ये सरावादरम्यान कॅमेरुन ग्रीन गोलंदाजीचा सराव करत होता. केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा, आकाशदीप दुखापतीमुळं बाहेर गेल्यानं गोलंदाजी कमजोर झाली आहे. यामुळं केकेआरची कामगिरी निराशाजनक झाली आहे.
कॅमेरन ग्रीन मध्यमगती गोलंदाज असून त्यानं टी 20 करिअरमध्ये 73 मॅचमध्ये 30 विकेट घेतल्या आहेत. कॅमेरुन ग्रीन हा प्रामुख्यानं फलंदाज असून संघासाठी तो सहावा गोलंदाज म्हणून भूमिका पार पडतो. आयपीएलमध्ये केकेआरची कामगिरी निराशाजनक झालेली आहे, आता केकेआरला एक अनुभवी गोलंदाजी कॅमेरुन ग्रीनच्या रुपात मिळणार आहे.
कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएलच्या 17 व्या हंगामात एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. मुंबई इंडियन्स विरुद्ध त्यांचा 6 विकेटनं पराभव झाला. सनरायजर्स हैदराबादनं देखील केकेआरला 6 विकेटनं पराभूत केलं. पंजाब किंग्ज आणि केकेआर यांच्यातील सामना पावसामुळं रद्द झाला होता. दरम्यान, केकेआर 1 गुणासह आठव्या स्थानावर आहे.




















