एक्स्प्लोर

मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?

मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीत सरपंच पदासाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी उद्या आपला उमदेवारी अर्ज दाखल करणार आहेत

बीड: जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांच्या हत्येला 1 वर्षाचा कालावधी उलटला असून या प्रकरणातील आरोपी तुरुंगात आहेत. दुसरीकडे आता, येथील ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर झाला असून मस्साजोगचा नवा सरपंच कोण याची उत्सुकता सर्वांनाच आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेच गावचा कारभार हाती घेतील का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, आता मस्साजोगच्या (Beed) सरपंच पदासाठी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीत सरपंच पदासाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी उद्या आपला उमदेवारी अर्ज दाखल करणार आहेत. देशमुख कुटुंबीयांनी एकमताने आणि ग्रामस्थांशी विचार विनिमय, चर्चा करुन अश्विनी देशमुख यांचे नाव निश्चित केलं आहे. त्यानुसार, उद्या सकाळी 11.00 वाजता सरपंच पदासाठी त्या आपला उमेदवारी अर्ज साध्या पद्धतीने दाखल करणार आहेत. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोगचे सरपंच पद रिक्त झाले होते. आता, नव्याने गावचा कारभार हाती घेणाऱ्या नवीन सरपंचांचा कालावधी 18 महिने इतका असणार आहे.

मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा अर्ज भरुन त्यांना बिनविरोध सरपंच पद द्यावे अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नीला सरपंच पद देणे हीच खरी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली असणार आहे, अशी गावतील महिला वर्गाचीही मागणी आहे. तर, त्यांना सरपंचपदाचा अनुभव असल्याचेही सांगितले जाते. दरम्यान, येथील सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध होणार की मतदान होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम 

7 ते 13 एप्रिल 
अर्जाची छाननी - 15 एप्रिल 
अर्ज मागे घेण्याची तारीख - 17 एप्रिल 
मतदान - 28 एप्रिल 
निकाल - 29 एप्रिल

भावाचा टॅटू मानेवर काढला

दरम्यान, धनंजय देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या भावाबद्दलचे प्रेम एका वेगळ्याच कृतीतून व्यक्त केले. धनंजय यांनी भाऊ संतोष देशमुखांचा फोटो टॅटूच्या माध्यमातून मानेवर काढला. त्यासोबतच सत्य-विरा-युध्द असे नावं कोरले आहेत. जी त्यांच्या मुलांची नावं आहेत. टॅटू काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असुन सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन येत आहेत.

हेही वाचा

बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar Varkari Community Controversy: शरद पवारांनी हिंदू समाजाची ताकद वाटण्याचा प्रयत्न करू नये, संजय शिरसाटांची बोचरी टीका
शरद पवारांनी हिंदू समाजाची ताकद वाटण्याचा प्रयत्न करू नये, संजय शिरसाटांची बोचरी टीका
Sharad Pawar Varkari Community Controversy: मौलाना शरद पवारांना वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय, तुम्ही जाळीदार टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडता तेव्हा...; तुषार भोसलेंची घणाघाती टीका
मौलाना शरद पवारांना वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय, तुम्ही जाळीदार टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडता तेव्हा...; तुषार भोसलेंची घणाघाती टीका
Krishnaraaj Mahadik on Nashik IT Company Conversion case: नाशिक धर्मांतर प्रकरणात भाजप युवा मोर्चा आक्रमक, कृष्णराज महाडिकांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र; म्हणाले, 'महिलांच्या सुरक्षेसाठी...'
नाशिक धर्मांतर प्रकरणात भाजप युवा मोर्चा आक्रमक, कृष्णराज महाडिकांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र; म्हणाले, 'महिलांच्या सुरक्षेसाठी...'
Gopichand Padalkar on Nashik IT Company conversion Case: हिंदू 2090 पर्यंत अल्पसंख्याक होतील, नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावरून गोपीचंद पडळकरांचा दावा
हिंदू 2090 पर्यंत अल्पसंख्याक होतील, नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावरून गोपीचंद पडळकरांचा दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
America Iran Islamabad Talks: इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
Embed widget