Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
उपमुख्यमंत्री एकनाछ शिंदे यांनी शिवसेनेच्या नव्याने नियुक्त संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुखांची ऑनलाईन बैठक घेत पक्ष संघटनेचा सखोल आढावा घेतला. या बैठकीत शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत 'काम नाही तर पदही नाही' असा कडक संदेश दिला. बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मंत्री, आमदार, खासदार ही पदं बाजूला ठेवून सर्वांनी कार्यकर्त्यांप्रमाणे काम करण्याचे आदेश दिले. पक्ष वाढीसाठी प्रत्येकाने प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक पदाधिकाऱ्याची वैयक्तिक विचारणा
एकनाथ शिंदेंनी प्रत्येक संपर्क प्रमुखाला थेट प्रश्न विचारत कामाचा हिशोब मागितला. आतापर्यंत किती BLA नेमले, किती वेळा मतदारसंघात भेटी दिल्या, किती बैठका घेतल्या, याची सविस्तर माहिती मागवण्यात आली. कामगिरी समाधानकारक नसल्यास थेट कारवाईचा इशाराही देण्यात आला.काम नाही तर थेट नारळ मिळणार संपर्कप्रमुखांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कामाचा नियमित अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. काम केल्याची अपडेट आली नाही, तर थेट नारळ दिला जाईल, असा इशारा शिंदेंनी बैठकीत दिला. तसेच प्रत्येक बैठकीचे फोटो आणि तपशील रोज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.




















