एक्स्प्लोर

Vaibhav Sooryavanshi MI vs RR IPL 2026: जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर 2 गगनचुंबी षटकार ठोकले, मुंबईला लोळवलं; आता वैभव सूर्यवंशीची 4 शब्दांची पोस्ट!

Vaibhav Sooryavanshi MI vs RR IPL 2026: यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी स्फोटक फलंदाजी करत राजस्थानला भक्कम धावसंख्या उभारून दिली.

Vaibhav Sooryavanshi MI vs RR IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (Mumbai Indians vs Rajasthan Royals) यांच्यात सामना खेळणव्यात आला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 27 धावांनी (MI vs RR) विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी 11 षटकांच्या खेळविण्यात आलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 11 षटकांत 3 बाद 150 धावा उभारल्या. यानंतर मुंबईला 11 षटकांत 9 बाद 123 धावांवर रोखत राजस्थानने सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) यांनी स्फोटक फलंदाजी करत राजस्थानला भक्कम धावसंख्या उभारून दिली. यशस्वी जैस्वालने केवळ 23 चेंडूत अर्धशतक ठोकताना 32 चेंडूत नाबाद 77 धावा कुटल्या. तर वैभव सूर्यवंशीने 14 चेंडूत 39 धावा ठोकल्या. विशेष म्हणजे वैभव सूर्यवंशीने जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. तर जसप्रीत बुमराहच्या तीन चेंडूंवर वैभव सूर्यवंशीने दोन षटकार ठोकले. वैभव सूर्यवंशीच्या डावाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. (Vaibhav Sooryavanshi Jasprit Bumrah Six)

सामना जिंकल्यानंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला? (Vaibhav Sooryavanshi vs Mumbai Indians)

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने मुंबई इंडियन्सविरुद्ध एक धडाकेबाज खेळी साकारली. 278.57 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना, वैभव सूर्यवंशीने आपल्या या खेळीत 5 षटकार आणि 1 चौकार लगावत 39 धावा केल्या. जसप्रीत बुमराहसमोरही त्याने आपली खेळण्याची रणनीती बदलली नाही. उलट, जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच षटकात त्याने दोन षटकार ठोकले. मुंबई इंडियन्सविरुद्ध सामना जिंकल्यानंतर आता वैभव सूर्यवंशीने 4 शब्दांची पोस्ट केली आहे. सामन्यातील काही फोटो शेअर करुन तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद...असं वैभव सूर्यवंशीने म्हटलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vaibhav (@vaibhav_sooryavanshi09)

मुंबई आणि राजस्थानचा सामना कसा राहिला? (Rajasthan Royals vs Mumbai Indians)

151 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या डावाची सुरुवातच धक्क्याने झाली. सलामीवीर रायन रिकलटन 8 धावा करून जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर ध्रुव जुरेलकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर अनुभवी रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र संदीप शर्माने त्याला अवघ्या 5 धावांवर पायचीत करून माघारी धाडले. फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार यादव देखील अपयशी ठरला. त्याला नांद्रे बर्गरने 6 धावांवर असताना जोफ्रा आर्चरच्या हाती झेलबाद केले. तर कर्णधार हार्दिक पंड्याने 9 चेंडूत 15 धावा केल्या, पण तोदेखील मोक्याच्या वेळी बाद झाला. रवी बिश्नोई आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी 2 बळी घेत मुंबईच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. मुंबई इंडियन्सला 11 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 123 धावा करता राजस्थान रॉयल्सने 27 धावांनी शानदार विजय मिळवला.

संबंधित बातमी:

Vaibhav Suryavanshi vs Jasprit Bumrah : पहिला चेंडू, पहिलाच षटकार.... वैभव सूर्यवंशीचा सिक्स पाहून बुमराहही अवाक्, 14 चेंडूत नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs RCB IPL 2026 : एकटा वैभव विरुद्ध संपूर्ण RCB! सूर्यवंशीच्या जिद्दीपुढे गतविजेत्यांची शान झुकली, बंगळुरूचा पहिला पराभव, तर राजस्थानचा विजयी 'चौकार'
एकटा वैभव विरुद्ध संपूर्ण RCB! सूर्यवंशीच्या जिद्दीपुढे गतविजेत्यांची शान झुकली, बंगळुरूचा पहिला पराभव, तर राजस्थानचा विजयी 'चौकार'
RR vs RCB Live Score Update : गुवाहाटीत वैभव सूर्यवंशीचे वादळ; राजस्थानचा बंगळुरूवर दणदणीत विजय
RR vs RCB LIVE IPL 2026 : गुवाहाटीत वैभव सूर्यवंशीचे वादळ; राजस्थानचा बंगळुरूवर दणदणीत विजय
आयपीएल 2026चे 15 सामने संपले; हे 4 संघ प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात पुढे, तर 'या' बड्या टीम्सचं अस्तित्वच धोक्यात, Points Table मध्ये पहा कोण कुठे?
आयपीएल 2026चे 15 सामने संपले; हे 4 संघ प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात पुढे, तर 'या' बड्या टीम्सचं अस्तित्वच धोक्यात, Points Table मध्ये पहा कोण कुठे?
Mukul Choudhary Untold Story : घर विकलं, कर्ज काढलं, जेलही भोगली, रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ; मुकुल चौधरीच्या वडिलांची Untold Story
घर विकलं, कर्ज काढलं, जेलही भोगली, रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ; मुकुल चौधरीच्या वडिलांची Untold Story
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Embed widget