एक्स्प्लोर

बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?

बारामती पोटनिवडणुकीमध्ये आजच्या दिवशी सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, अंतिम आकडेवारी यायला वेळ लागणार असून अद्याप दुपारी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन प्रक्रिया सुरु होती.

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती (Baramati) पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवट दिवस आहे. मात्र, काँग्रेसने कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, अशी भूमिका घेतल्याने बारामतीत पोटनिवडणूक होणार, मतदान होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तरीही उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी आणखी काही घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यातच, आज बारामतीच्या पोटनिवडणुकीत (Byelection) 6 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) विधानसभा मतदारसंघातून आज 4 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याची माहिती आहे. 

बारामती पोटनिवडणुकीमध्ये आजच्या दिवशी सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, अंतिम आकडेवारी यायला वेळ लागणार असून अद्याप दुपारी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे, आज आणखी किती उमेदवार अर्ज माघारी घेतात हे उशिरा कळणार आहे. अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असणार आहे, त्यामुळे बारामतीत उद्या मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात. येथे एकूण 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते, त्यातील सहा जणांनी आत्तापर्यंत माघार घेतले आहे. त्यामुळे, सध्या 47 उमेदवार रिंगणार आहेत. तर, अहिल्यानगरमध्ये 18 उमेदवार रिंगणात उरले आहेत. दरम्यान, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला असून त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने उमेदवार दिला आहे. काँग्रेसने आकाश मोरे यांना तिकीट दिलं असून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 

राहुरीत 4 जणांचे अर्ज माघारी

अहिल्यानगरच्या राहुरी पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशी चार उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे 18 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत, उद्या गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे, मोठ्या राजकीय हालचाली घडू शकतात. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दोन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर मविआतील ठाकरे सेनेचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे, या उमेदवारांचा नेमका काय निर्णय होतो ते देखील पाहावं लागेल. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून येथे उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे, भाजप महायुतीचे अक्षय कर्डीले विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंदराव मोकाटे यांच्यात थेट लढत होणार आहे.  

दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात तब्बल सध्या 47 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, भाजप सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची यांनी दिली. 

जनता काँग्रेसला माफ करणार नाही

स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडत आहे. त्यासाठी सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी सर्वपक्षीयांकडून प्रयत्न सुरू असताना काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसची ही कृती निंदनीय असून अजित दादांनी काँग्रेस सरकारमध्ये राहून त्यांची महाराष्ट्रात ताकद वाढवली होती. मात्र, काँग्रेसची ही कृती आणि त्यांची झालेली अधोगती याला अनेक कारणे आहेत. महाराष्ट्रातील जनता काँग्रेसला कधीच माफ करणार नाही, असे नितेश राणेंनी म्हटलं. 

हेही वाचा

विधिमंडळात गाजलेल्या सातारा झेडपी अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; कुणबी प्रमाणपत्र बेकायदेशीर, घाईघाईत बनवलं, याचिका दाखल

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget