एक्स्प्लोर
लोकेश राहुलच्या पाठीवर बेस्ट फ्रेंडचा टॅटू!
'ओळखा माझ्या पाठी कोण आहे मित्रांनो... माझा #लायनकिंग' असं कॅप्शन देत राहुलने ट्विटरवर फोटो शेअर केला आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलला टॅटू काढून घेण्याची आवड असल्याचं चाहत्यांना माहित आहेच. लोकेश राहुलने आता आपल्या पाठीवर टॅटू काढून घेतला असून यामध्ये त्याच्या बेस्ट फ्रेंडचा चेहरा आहे.
हा बेस्ट फ्रेंड म्हणजे दुसरं-तिसरं कोणी नाही, तर त्याचा लाडका कुत्रा सिंबा आहे. लोकेश राहुलने ट्विटरवर अनेकवेळा सिंबासोबतचे फोटो शेअर केले आहेत. कुत्र्याबरोबर वेळ घालवणं आपल्याला कसं आवडतं, हे तो वारंवार सांगत असतो. हेच प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने थेट टॅटूच करुन घेतला आहे.
'ओळखा माझ्या पाठी कोण आहे मित्रांनो... माझा #लायनकिंग' असं कॅप्शन देत राहुलने ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या पाठीवर टॅटू ठळकपणे दिसत आहे.
https://twitter.com/klrahul11/status/904938344429191168
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement