एक्स्प्लोर
'या' कारणामुळे राहुल द्रविड मतदान करु शकणार नाही
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड 18 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीत मतदान करु शकणार नाही.
बंगळुरु : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड 18 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीत मतदान करु शकणार नाही. राहुलचे मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्याला मतदान करता येणार नाही. राहुल द्रविड सध्या कर्नाटक निवडणूक आयोगाचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. निवडणूक आयोगाजा ब्रॅण्ड अॅम्बेसिडरच मतदान करु शकणार नसल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.
राहुलने त्याचा पत्ता बदलल्यानंतर जुन्या मतदार यादीतून स्वतःचे नाव हटवण्यासाठी अर्ज क्रमांक 7 भरला होता. त्यानंतर मतदार यादीतून त्याचे नाव हटवण्यात आले. नव्या पत्त्यावरील मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी राहुलला अर्ज क्रमांक 6 भरणे आवश्यक होते. परंतु राहुलने अद्याप अर्ज क्रमांक 6 भरलेला नाही. त्यामुळेच मतदार यादीत त्याने नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही.
दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही दोनवेळा द्रविडच्या घरी गेलो होतो. परंतु आमची द्रविडसोबत भेट झाली नाही. द्रविडकडे 16 मार्चपर्यंत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी होती. परंतु आता ती संधी त्याने गमावलेली आहे. राहुल द्रविड ज्या भागात राहतो. तिथल्या मतदार संघात 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
मतदार यादीतून नाव हटवण्यासाठी प्रत्येक मतदाराला अर्ज क्रमांक 7 भरावा लागतो. त्यानंतर पुन्हा एकदा मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज क्रमांक 6 भरणे आवश्यक असते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement