एक्स्प्लोर
2008 ला हिरोसोबत फोटो, 2016 ला हिरोला हरवलं
रिओ दी जानेरो : लहानपणी ज्याचा फॅन होता, ज्याच्यासोबत एक फोटो काढण्याची इच्छा होती, त्याच आपल्या हिरोला हरवण्याची करामत, जलतरणपटू जोसेफ स्कूलिंगने केली आहे. ऑलिम्पिकमध्ये तब्बल 22 सुवर्णपदकं जिंकणाऱ्या मायकल फेल्प्सला स्कूलिंगने हरवलं.
रिओ ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात, सिंगापूरच्या स्कूलिंगने 50.39 सेंकदाची वेळ नोंदवून गोल्ड मेडलवर कब्जा केला. त्याने अमेरिकेचा विश्वविक्रमवीर जलतरणपटू आणि त्याचा हिरो मायकल फेल्प्सला मागे टाकलं. फेल्प्सने 51.14 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकलं.
पण विशेष म्हणजे या स्पर्धेत फेल्प्ससह दक्षिण आफ्रिकेच्या चॅड ली क्लोज आणि हंगेरीच्या लासल्सो सेह यांनीही 51.14 सेंकदाचीच वेळ नोंदवली. त्यामुळं या तिघांनीही रौप्यपदक देण्यात आलं.
2008 ला हिरोसोबत फोटो, 2016 ला हिरोला हरवलं
दरम्यान जोसेफ स्कूलिंग हा मायकल फेल्प्सचा मोठा फॅन आहे. 31 वर्षीय फेल्प्सने ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकांची रास लावली आहे. त्याने आतापर्यंत एकट्याने 22 सुवर्णपदकं जिंकली आहेत, तर एकूण 27 पदकं त्याच्या खात्यात आहेत.
2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान 21 वर्षीय जोसेफ स्कूलिंगला त्याच्या हिरोला म्हणजेच फेल्प्सला भेटण्याची संधी मिळाली. स्कूलिंगने फेल्प्ससोबत फोटो आणि त्याची ऑटोग्राफही घेतली होती. त्यावेळी त्याचा आनंद गगनात मावेनासा होता. फेल्प्ससोबत भेट झाली त्यावेळी स्कूलिंग अवघ्या 13 वर्षांचा होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement