(Source: ECI/ABP News/ABP Majha)
What Is Retired Out: रिटायर्ड हर्ट आणि रिटायर्ड आऊटमध्ये नेमका फरक काय? राजस्थान आणि लखनौ सामन्यात घडली ऐतिहासिक गोष्ट
What Is Retired Out: राजस्थान आणि लखनौ यांच्यात रविवारी आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील वीसावा सामना खेळण्यात आला.
What Is Retired Out: राजस्थान आणि लखनौ यांच्यात रविवारी आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील वीसावा सामना खेळण्यात आला. या सामन्यात राजस्थाननं लखनौच्या संघाला तीन धावांनी पराभूत केलं. या सामन्यात एक ऐतिहासिक गोष्ट पाहायला मिळाली. राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू आर. अश्विन रिटायर्ड आऊट झाला. आयपीएलमध्ये अशा पद्धतीनं आऊट होणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्यानंतर सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली. परंतु, रिटायर्ड हर्ट आणि रिटायर्ड आऊटमध्ये नेमका फरक काय? याबद्दल जाणून घेऊयात.
राजस्थान- लखनौ सामन्यादरम्यान काय घडलं?
या सामन्यात नाणेफेक जिंकून लखौनच्या संघानं राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर राजस्थानकडून 10 व्या षटकात आर अश्विन सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. परंतु, त्यानंतर शिमरॉन हेटमायरबरोबर फलंदाजी करत असताना 19 व्या षटकाचे पहिले दोन चेंडू खेळून झाल्यानंतर बाद नसतानाही पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळं तो रिटार्ड आऊट झाला. त्यानं 23 चेंडूत 28 धावांची खेळी केली. तसेच हेटमायरसह 68 धावांची भागीदारी केली. अश्विनच्या या निर्णयामुळे आयपीएल इतिहासात असं पहिल्यांदाच असं झालं की, एखादा खेळाडू रिटायर्ड आऊट झाला. यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं.
रिटायर्ट हर्ट आणि रिटायर्ड आऊटमध्ये नेमका फरक काय?
रिटायर्ड हर्ट आणि राटयर्ड आऊटमध्ये खूप अंतर आहे. जर एखादा खेळाडू सामना सुरु असताना दुखापतग्रस्त, क्रॅम्प आणि हॅमस्ट्रिंगमुळं फलंदाजी करू न शकल्यास त्यानं मैदान सोडल्यास त्याला रिटायर्ड हर्ट म्हटलं जातं. तर, रिटायर्ड आऊट म्हणजे, एखादा खेळाडू स्वच्छनं मैदान सोडतो आणि दुसऱ्या फलंदाजाला मैदानात येण्याची संधी देतो, त्याला रिटायर्ड आऊट म्हणतात.
हे देखील वाचा-
- RR Vs LSG: भरमैदानात युजवेंद्र चहल पंचाशी भिडला! संजू सॅमसनला करावा लागला हस्तक्षेप, पाहा व्हिडिओ
- Kuldeep Yadav Superman Catch: कुलदीप यादव बनला ‘सुपरमॅन', घेतला अफलातून कॅच; मैदानावरील प्रेक्षकही झाले आश्चर्यचकीत!
- IPL 2022: विराटमुळं डेटवर जायची थांबली 'ही' तरूणी! भरमैदानात पोस्टर झळकावून सांगितलं कारण, पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या