Virat Kohli : सुनील गावसकरांनी कोहलीला झापलं, विराटची बाजू घेत पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूची बॅटिंग
Virat Kohli : भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी विराट कोहलीवर टीका केली होती. विराट कोहलीनं स्ट्राइक रेटवरुन केलेल्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला.
Virat Kohli Sunil Gavaskar बंगळुरु : विराट कोहलीनं यदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटनं सर्वाधिक धावा केल्या असल्या तरी त्याच्या स्ट्राइक रेटवरुन सतत चर्चा सुरु आहेत. विराट कोहलीच्या स्ट्राइक रेटवरुन माजी खेळाडूंनी टीका केली होती. या टीकेला विराट कोहलीनं देखील प्रत्युत्तर दिलं होतं. विराट कोहलीच्या या टीकेनंतर भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी त्याला सुनावलं होतं. आता विराट कोहलीच्या बाजूनं पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू उभा राहिलाय. पाकिस्तानचे दिग्गज बॉलर वसिम आक्रम यांनी विराट कोहलीची बाजू घेतलीय.
वसिम आक्रमक काय म्हणाले?
स्पोर्टसकीडा वेबसाईट सोबत बोलताना वसीम आक्रम यांनी विराट कोहलीची बाजू घेत भूमिका मांडली. आक्रम म्हणाले की त्याच्यावर कशा प्रकारची टीका केली जात आहे? त्याची टीम पराभूत होत आहे? तो खेळाडू 115च्या स्ट्राइक रेटनं 100 धावा करतो, ही चांगली कामगिरी नाही का? जर विराटची टीम जिंकली असती तर अशा प्रकारची टीका झाली नसती. विराट कोहली धावा करतोय मात्र एकटा खेळाडू संघाला विजय मिळवून देऊ शकत नाही, असं वसिम आक्रम म्हणाले.
विराट कोहलीवर टीका करणं आवश्यक नसून ते योग्य नाही. दूरदृष्टीनं विचार केला तर विराट कोहली अजून बराच काळ क्रिकेट खेळू शकतो. आरसीबीनं विचार केला पाहिजे की त्यांची कामगिरी सातत्यपूर्ण का राहत नाही, असं वसिम आक्रम म्हणाले.आयपीएलच्या 16 व्या वर्षानंतर देखील आरसीबीची स्थिती अशी का याचा देखील विचार करावा, असं आक्रम म्हणाला. आरसीबीची फलंदाजी चांगली असून गोलंदाजी कमजोर असल्याचं आक्रमनं म्हटलं.
सुनील गावसकर हे स्टार स्पोर्टससाठी तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. त्यांनी आरसीबी आणि गुजरातची मॅच संपल्यानंतर विराट कोहली आणि प्रक्षेपकांवर टीका केली. संबंधित वाहिनीनं 12 वेळा त्याचं प्रक्षेपण केलं, असं देखील ते म्हणाले.
समालोचकांनी जेव्हा त्याचं स्ट्राइक रेट 118 होतं तेव्हा प्रश्न विचारले होते. मी काही अनेक सामने पाहिलेले नाहीत. मात्र, जेव्हा तुम्ही डावाची सुरुवात करता आणि 14- 15 व्या ओव्हरमध्ये बाद होता त्यावेळी तुमचं स्ट्राइक रेट 118 असतं. या कामगिरीसाठी तुमचं कौतुक व्हावं अशी अपेक्षा तुमची असते का असं सुनील गावसकर म्हणाले.
प्रत्येक जण आम्ही बाहेर काय बोललं जात याची पर्वा करत नाही असं म्हणतात मग तुम्ही बाहेरच्यांना उत्तर का देताय, असा सवाल गावसकर यांनी केला होता.
संबंधित बातम्या :