PBKS vs CSK :हर्षल पटेलचा धमाका, भेदक यॉर्करनं धोनीच्या दांड्या गुल, माहीला काही कळलंच नाही, पाहा व्हिडीओ
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदा शुन्यावर बाद झाला आहे. धोनीला पंजाबच्या हर्षल पटेलनं शुन्यावर बाद केलं.
IPL 2024, PBKS vs CSK, MS Dhoni धर्मशाला : आयपीएलमध्ये (IPL 2024) धर्मशाला येथे पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आमने सामने आले आहेत. पंजाब किंग्जचा कॅप्टन सॅम करन यानं टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या गोलंदाजांनी चेन्नईला नियमितपणे धक्के देत धावसंख्या आटोक्यात ठेवली. चेन्नई सुपर किंग्जचा विकेटकीपर आणि माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. महेंद्रसिंह धोनीला हर्षल पटेलनं (Harshal Patel) शुन्यावर बाद केलं.
धोनी आला तसा माघारी गेला
महेंद्रसिंह धोनी सातवी विकेट पडल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आला. धोनी 19 व्या ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी आला होता. महेंद्रसिंह धोनी मोठी फटकेबाजी करेल अशी आशा चेन्नईच्या टीमला आणि धर्मशाला स्टेडियमवरील प्रेक्षकांना होती. मात्र, चेन्नई सुपर किंग्जचा महान खेळाडू म्हणजेच धोनी मोठी फटकेबाजी करण्यात अपयशी ठरला. हर्षल पटेलनं महेंद्रसिंह धोनीला शुन्यावर बाद केलं. हर्षल पटेलनं टाकलेला यॉर्कर काही कळायच्या आत स्टम्पवर जाऊन आदळला. धोनी हे सर्व पाहात राहिला.
धोनी पहिल्यांदा शुन्यावर बाद
महेंद्रसिंह धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्यानं शेवटच्या काही ओव्हरमध्ये फलंदाजीला येत आहे. त्यामुळं त्याला मोठी धावसंख्या उभारणं शक्य नसलं तरी जितके बॉल खेळायला मिळतील तेवढ्या काळात धोनी जोरादर फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय.मात्र, आज पंजाब किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये देखील धोनीकडून तशी अपेक्षा होती. मात्र, धोनी ती अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला. हर्षल पटेलच्या यॉर्करवर यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी शुन्यावर बाद झाला.
The reactions say it all! #IPLonJioCinema #TATAIPL #PBKSvCSK pic.twitter.com/owCucgYN8d
— JioCinema (@JioCinema) May 5, 2024
चेन्नईच्या 167 धावा
चेन्नई सुपर किंग्जनं 20 ओव्हरमध्ये 9 बाद 167 धावा केल्या. चेन्नईच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. अंजिक्य रहाणे आज देखील मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. रहाणे यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्यानं अपयशी ठरतोय. यानंतर कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेलनं डाव सावरला. मात्र, दोघांना देखील मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. ऋतुराज गायकवडनं 32 तर मिशेलनं 30 धावा केल्या. यानंतर रवींद्र जडेजानं जोरदार फलंदाजी करत 43 धावा करुन चेन्नईचा डाव सावरला.
चेन्नई सुपर किंग्जनं 20 ओव्हरमध्ये 9 बाद 167 धावा केल्या आहेत. चेन्नईसाठी आजची मॅच महत्वाची आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आजच्या मॅचमध्ये विजय मिळवणं आवश्यक आहे.
संबंधित बातम्या :