CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा कमनशिबी ठरला, धोनीचं बारा वर्षापूर्वीचं रेकॉर्ड संकटात, वाचा नेमकं काय घडलं?
CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा टॉस जिंकण्यात अपयशी ठरलाय. यंदाच्या आयपीएलमध्ये त्यानं 10 वेळा टॉस गमावले आहेत.
PBKS vs CSK धर्मशाला: चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्त्व यंदा महेंद्रसिंह धोनी ऐवजी ऋतुराज गायकवाड करत आहे. मात्र, ऋतुराज गायकवाड साठी यंदाचं आयपीएल एका बाबतीत निराशाजनक ठरलं आहे. आज पंजाब किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये देखील ऋतुराज गायकवाडनं टॉस गमावला आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वात चेन्नईनं यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 11 मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी 10 मॅचमध्ये त्यानं टॉस गमावला आहे. केवळ एक मॅच सोडून इतर मॅचमध्ये चेन्नईनं पहिल्यांदा बॅटिंग करावी की बॉलिंग करावी यासंदर्भात निर्णय घेण्याची संधी ऋतुराज गायकवाडला मिळाली नाही. आज देखील पंजाब किंग्ज विरुद्ध ऋतुराज गायकवाडनं टॉस गमावला. पंजाब किंग्जनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतल्यानं चेन्नईचा संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय. ऋतुराज गायकवाडनं केवळ एक टॉस कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध जिंकला होता. ती मॅच चेन्नईनं 7 विकेटनं जिंकला होता.
चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं 11 पैकी 10 मॅचमध्ये टॉस गमावला. मात्र, चेन्नई सुपर किंग्जनं टॉस गमावल्यानंतरही चारवेळा मॅच जिंकली आहे. ऋतुराजनं 10 टॉस गमावले असले तरी चेन्नईची कामगिरी चांगली राहिली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा संघ टॉस गमावत असला तरी कॅप्टन ऋतुराज गायकवाडची कामगिरी मात्र चांगली झाली आहे. ऋतुराज गायकवाडनं यानं आजच्या मॅचपूर्वीपर्यंत 509 धावा केल्या आहेत.
ऋतुराज गायकवाड धोनीचा नकोसा विक्रम मोडणार?
ऋतुराज गायकवाडनं एका हंगामात 10 टॉस गमावले आहेत. दुसरीकडे संजू सॅमसन यानं 2022 च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन म्हणून 13 वेळा टॉस गमावला होता. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीनं 2012 च्या आयपीएलमध्ये 12 वेळा टॉस गमावला होता. ऋतुराज गायकवाड या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानं आतापर्यंत 10 टॉस गमावले आहेत. चेन्नईचे अजून तीन सामने बाकी आहेत. त्यामुळं टॉस गमावण्याच्या शर्यतीत ऋतुराज गायकवाड महेंद्रसिंह धोनी आणि संजू सॅमसनचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे, असं म्हटलं जातंय.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असून आजच्या मॅचमध्ये विजय मिळवून टॉप फोर मध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. चेन्नई सुपर किंग्जला प्ले ऑफमधील स्थान पक्कं करण्यासाठी आजच्या मॅजमध्ये विजय आवश्यक आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2024 RCB vs GT: भर मैदानात विराट कोहलीने रिद्धिमान साहाला दिली शिवी; Video आला समोर