एक्स्प्लोर

IPL 2022 : सनरायजर्स हैदराबाद का झाली पराभूत? 'ही' आहेत महत्त्वाची कारणं

SRH vs RR : संजू सॅमसनची धडाकेबाज फलंदाजी आणि युझवेंद्र चहलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. दरम्यान या पराभवात काही महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरल्या.

IPL 2022 : आयपीएलमध्ये (IPL 2022) मंगळवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात संजू सॅमसनची विस्फोटक फलंदाजी आणि युझवेंद्र चहलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. या विजयासह राजस्थान संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. तर दुसरीकडे हैदराबाद संघ मात्र पहिल्याच सामन्यात पराभूत झाला आहे. तर नेमकी या पराभवामागे कोणती कारणे आहे, त्यावर एक नजर फिरवूया...  

1. भुवनेश्वरचा तो नो बॉल : सनरायजर्स गोलंदाजी करताना पहिल्यात षटकात भुवनेश्वरने दमदार गोलंदाजी केली.यावेळी त्याने केवळ एकच रन दिला. पण राजस्थानचा तगडा खेळाडू जोस बटलरला या ओव्हरमध्ये त्याने बाद केलं. पण तोच बॉल नो बॉल पडल्याने त्याला बाद घोषित करण्यात आलं नाही. त्यामुळे हैदराबादला मोठा तोटा झाला

2. हैदराबादचे फिरकीपटू फ्लॉप : वॉशिंग्टन सुंदर सनरायजर्सचा मुख्य फिरकीपटू असून तो कालच्या सामन्यात खास गोलंदाजी करु शकला नाही. त्याने तीन ओव्हरमध्ये एकूण 47 रन दिले. याउलट दुसरीकडे राजस्थानचे स्पिनर चहल आणि आश्विन यांनी अप्रतिम गोलंदाजी केली.

3. राजस्थानची दमदार फलंदाजी : सामन्यात हैदराबादच्या सर्वच फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. सर्वांनी आपआपल्यापरीने योगदान देत संघाला 200 पार पोहोचवलं. यात  जॉस बटलरने 35, यशस्वी जैस्वालने 20, संजू सॅमसनने 55, देवदत्त पड्डीकलने (41) आणि शिमरोन हेटमायरने 32 धावा केल्या. ज्यामुळे राजस्थानने 210 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.

4. एडन मार्करमला वर खेळायला न पाठवणे : सनरायजर्सचा कर्णधार केन विलियमसनने एडन मार्करला पाचव्या क्रमांकावर खेळवले. त्याने संघासाठी नाबाद 57 धावा केल्या. पण तेच त्याला वरच्या फळीत खेळवले असते तर त्यानेकाही अधिक धावा धावफलकावर लावल्या असत्या 

5. केन विल्यमसनचा 'तो' झेल : हैदराबादचा कर्णधार अवघ्या 2 धावांवर असताना पहिल्याच ओव्हरमध्ये स्लीपमध्ये झेलबाद झाला. पण ही कॅच देवदत्त पड्डीकलच्या हातात जाताना काहीशी मैदानात लागल्या सारखं दिसत होतं. पण तरीदेखील विल्यमसना बाद करार देण्यात आल्याने हैदराबाद फॅन्स नाराज होते.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Kolhe On Swarajyarakshak Sambhaji : राजकीय दबाव होता, हे फेक नरेटिव्ह : अमोल कोल्हेCity 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 Feb 2025 : ABP MajhaGaja Marne Arrest : मकोकाअंतर्गत गजा मारणेला चौथ्यांदा अटक, 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडीIndrajit Sawant Threat : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी, प्रशांत कोरटकरांविरधात गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
Embed widget