IPL 2023 Points Table : 'या' संघांजवळ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी, कोणत्या संघाकडे अजूनही आहे संधी; वाचा सविस्तर
IPL 2023 Points Table : या पर्वामध्ये आतापर्यंत 55 सामने पूर्ण होऊनही कोणतीही संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही आहे. गुजरात सध्या 16 अंकांसह गुणतालिकेत प्रथम स्थानावर आहे.
IPL 2023 Points Table : आयपीएलच्या (IPL) या सीझनमध्ये आता फक्त पंधरा सामने बाकी आहेत आणि त्यानंतर प्लेऑफचे (IPL PlayOff) सामने खेळवले जातील. परंतु आतापर्यंत झालेल्या 55 सामन्यानंतरही या पर्वात प्लेऑफमध्ये कोणताही संघ स्थान मिळवू शकला नाही आहे. गुणतालिकेत सध्या गुजरातचा संघ 11 सामने खेळत 16 अंकांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे गुजरातची प्लेऑफमधली जागा जवळपास निश्चित झाली आहे.
प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी गुजरातने आणखी एक सामना जिंकला तर त्याची प्लेऑफमधली जागा निश्चित होऊन जाईल. इतर संघांचा विचार केला तर चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी 98 टक्के संधी आहे. चेन्नईचा संघ सध्या 15 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सने बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर गुणतालिकेत थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबईच्या संघाकडे सध्या 12 गुण आहेत आणि त्यांना आणखी तीन सामने खेळावे लागणार आहेत. त्यामुळे मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी 61 टक्के संधी आहे.
राजस्थान, कोलकाता आणि बंगळुरूमध्ये रंगतदार लढत
गुणतालिकेत 11 गुणांसह लखनऊचा संघ चौथ्या स्थानावर आहे. त्यांमुळे लखनऊच्या संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी 44 टक्के संधी आहे. याशिवाय राजस्ठान रॉयल्स, कोलकाता नाईट राइडर्स आणि रॉयल चैलेंजर्स बेंगलोर अजूनही कठीण परिस्थितीमध्ये आहेत. राजस्थानच्या संघाला 25 टक्के, कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला 23 टक्के आणि बेंगलोर संघाला 22 टक्के संधी आहे. पंजाबच्या संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची फक्त 14 टक्केच संधी आहे. परंतु त्यांना स्वत:च्या संघाच्या विजयासोबतच इतर संघांची कामगिरी देखील महत्त्वाची ठरणार आहे. अशीच काहीशी स्थिती हैद्राबाद आणि दिल्लीच्या संघाची आहे.
आयपीएल गुणतालिकेत पंजाब किंग्स आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पंजाब संघाने आतापर्यंत 11 पैकी पाच सामने जिंकले तर सहा सामने गमावले आहेत. त्यानंतर सनरायजर्स हैदराबाद संघ सध्या नवव्या तर दिल्ली कॅपिट्ल्स दहाव्या स्थानावर आहे. हैदराबाद आणि दिल्ली दोन्ही संघानी त्यांच्या 10 पैकी चार सामन्यांत विजय मिळवला तर सहा सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. दोन्ही संघांकडे आठ गुण आहेत.
IPL 2023 Points Table - CSK and GT have almost confirmed their Playoffs spot. pic.twitter.com/FaUJZElDi6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 10, 2023