![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IPL 2022 Final: आयपीएलमधील महामुकाबला आज; कधी, कुठे पाहाल गुजरात- राजस्थान यांच्यातील लाईव्ह सामना?
IPL 2022 Final: जवळपास दोन महिने प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आयपीएलचा पंधरावा हंगाम अंतिम क्षणी पोहचला आहे.
![IPL 2022 Final: आयपीएलमधील महामुकाबला आज; कधी, कुठे पाहाल गुजरात- राजस्थान यांच्यातील लाईव्ह सामना? Tata IPL 2022 Final GT vs RR Live Streaming: Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Coverage, Venue, Date, Timing, LIVE SCORE, IPL 2022 Final: आयपीएलमधील महामुकाबला आज; कधी, कुठे पाहाल गुजरात- राजस्थान यांच्यातील लाईव्ह सामना?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/1b363f901eb765bfec4cbe438834f818_original.webp?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2022 Final: जवळपास दोन महिने प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आयपीएलचा पंधरावा हंगाम अंतिम क्षणी पोहचला आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात आज (29 मे 2022) आयपीएल 2022 मधील अंतिम सामना खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. यंदाच्या हंगामात गुजरातच्या संघानं दमदारी कामगिरी करून आधी सर्वात प्रथम प्लेऑफचं स्थान गाठलं. त्यानंतर क्वालिफायर 1 मध्ये राजस्थानचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. गुजरातकडून पराभूत झाल्यानंतर राजस्थानच्या संघानं क्वालिफायर 2 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यामुळं आजचा सामना रोमांचक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुजरात- राजस्थान यांच्यातील लाईव्ह सामना कधी, कुठे पाहता येणार?
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज आयपीएल 2022 मधील अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, रात्री आठ वाजता सामन्याला सुरूवात होईल. त्याआधी अर्धातास म्हणजेच साडेसात वाजता नाणेफेक होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. गुजरात- राजस्थान यांच्यातील स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
राजस्थान रॉयल्स संघ:
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मेकॉय, युझवेंद्र चहल, करुण नायर, जेम्स नीशम, रॅस वन डर दुसेन, कॉर्बिन बॉश, नवदीप सैनी, केसी करिअप्पा, डॅरिल मिशेल, तेजस बारोका, कुलदीप यादव, अनुनय सिंह, कुलदीप सेन, ध्रुव जुरेल, शुभम गढवाल.
गुजरात टायटन्स संघ:
ऋद्धिमान साहा (विकेटकिपर), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, यश दयाल, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, प्रदीप संगवान, वरुण आरोन, जयंत यादव, विजय शंकर, गुरकीरत सिंह मान, अभिनव मनोहर, लॉकी फर्ग्युसन.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)