IPL 2023 : हैदराबादचा यंदाच्या हंगामातील पहिला विजय, पंजाबच्या कामगिरीला ब्रेक; शिखर धवनची खेळी ठरली व्यर्थ, जाणून घ्या पंजाब संघाच्या पराभवाचं कारण
SRH vs PBKS : शिखर धवनची (Shikhar Dhawan) नाबाद 99 धावांची खेळी व्यर्थ ठरली आणि हैदराबादने यंदाच्या मोसमात पहिला विजय मिळवून खातं उघडलं.
Sunrisers Hyderabad vs Punjab Kings : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 14 व्या सामन्यात सनराइजर्स हैदराबादने (SRH) पंजाब किंग्सवर (PBKS) 8 विकेट्सने विजय मिळवला. हैदराबादला पंजाबने 144 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने 2 विकेट देऊन 145 धावा करत यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला आहे. पंजाबचा कर्णधार शिखर धवनची 99 धावांची खेळी व्यर्थ ठरली. शिखर धवन (Shikhar Dhawan) नेतृत्व करत असलेल्या पंजाब संघाला पराभवाचा सामना करावा लागला. याचं नेमकं कारण काय आहे, ते पाहुया.
पंजाबच्या फलंदाजांची खराब खेळी
नाणफेक हरल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या (PBKS) संघाला 20 ओवरमध्ये 9 विकेट देत केवळ 143 धावा करता आल्या. यात एकट्या शिखर धवनने 99 धावांची खेळी केली असली तरी, इतर फलंदाज मात्र त्याला साथ देऊ शकले नाहीत. शिखरने 12 चौकार आणि 5 षटकारसह 99 धावांची खेळी केली.
हैदराबादची दमदार गोलंदाजी
सनराइजर्स हैदराबाद (SRH) संघाच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत पंजाबच्या (PBKS) फंलदाजांना तंबूत परतवलं. स्पिनर मयंक मारकंडेने 4 ओवरमध्ये 15 धावा देत 4 गडी गारद केले. अलावा मार्को यॉन्सेन आणि उमरान मलिकने प्रत्येकी 2-2 विकेट आणि भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) एक विकेट घेत पंजाबच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. यंदाच्या हंगामातील हैदराबाद संघाचा हा पहिलाच विजय आहे. (SRH First Win in IPL 2023)
A Rahul Tripathi chase ace 😎 and speedster Umran Malik's "Breaking Bail" story 💥
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023
Match-winners @umran_malik_01 & @rahultripathi sum up @SunRisers' clinical win at home ✅ - By @28anand
Full Interview 🎥🔽 #TATAIPL | #SRHvPBKS https://t.co/x3tN15pzzq pic.twitter.com/CdTWQKcomH
पंजाबची खराब गोलंदाजी
या सामन्यात पंजाबच्या संघाला केवळ 143 धावा करता आल्या. त्यामुळे हैदराबाद संघाला 144 धावांचा पाठलाग करण्यात यश मिळालं. हैदराबादला रोखण्यासाठी पंजाबला विकेट्स घेणं गरजेचं होतं मात्र पंजाबचे गोलंदाज विकेट्स घेण्यात अयशस्वी ठरले. पंजाबने 45 धावांवर 2 विकेट घेतले. त्यानंतर मात्र राहूल त्रिपाठी आणि कर्णधार एडन मार्करम या जोडीने आपली विकेट सांभाळत पंजाबच्या गोलंदाजांना एकही विकेट मिळू दिलं नाही. त्यामुळे हैदराबाद संघाने 17.1 ओवरमध्ये 2 विकेट देत 145 धावांची खेळी करत यंदाच्या हंगामातील पहिला विजय साजरा केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :