SRH vs PBKS, Match Highlights: हैदराबादचा पहिला विजय, धवनची शिखर खेळी व्यर्थ, पंजाबचा आठ विकेटने पराभव
IPL 2023 SRH vs PBKS: राहुल त्रिपाठीच्या अर्धशतकाच्या बळावर हैदराबादने पंजाबवर आठ विकेटने विजय मिळवलाय.
IPL 2023 SRH vs PBKS: राहुल त्रिपाठीच्या अर्धशतकाच्या बळावर हैदराबादने पंजाबवर आठ विकेटने विजय मिळवलाय. आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील हैदराबादचा पहिला विजय होय. हैदराबादच्या गोलंदाजांनी आधी भेदक मारा करत पंजाबला 143 धावांवर रोखले. त्यानंतर फलंदाजांनी आपले काम चोख बाजवत 144 धावांचे आव्हान सहज पार केले. राहुल त्रिपाठीच्या अर्धशतकाच्या बळावर हैदराबादने 17 चेंडू आणि आठ विकेट राखून पंजाबचा पराभव केला. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि राहुल चहर यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
पंजाबने दिलेल्या 144 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनराइजर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. सलामी फलंदाज मयंक अग्रवाल आणि हॅरू ब्रूक स्वस्तात माघारी परतले. ब्रूक याने 13 धावांची खेळी केली. तर मयंक अग्रवाल 21 धावांवर बाद झाला. हैदराबादचा डाव कोसळणार की काय असे वाटत होते. पण राहुल त्रिपाठीने मोर्चा सांभाळला. राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम यांनी शतकी भागिदारी करत पंजाबला विजय मिळवून दिला. राहुल त्रिपाठी याने 48 चेंडूत 74 धावांची खेळी केली. तर एडन मार्करम याने 37 धावांचे योगदान दिले. राहुल त्रिपाठी याने आपल्या अर्धशतकी खेळीत तीन षटकार आणि दहा चौकार लगावले. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
दरम्यान, हैदराबादच्या भेदक गोलंदाजीसमोर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबची फलंदाजी ढासळली. पण कर्णधार शिखर धवन याने एकाकी झुंज देत पंजाबची नामुष्की टाळली. शिखर धवन याने नाबाद 99 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. शिखर धवनच्या 99 धावांच्या खेळीच्या बळावर पंजाबने निर्धारित 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 143 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून मयांक मार्केंडेय याने चार विकेट घेतल्या.
शिखर धवनची एकाकी झुंज -
एकीकडे विकेट पडत असताना शिखर धवन याने संयमी फलंदाजी केली. धवन याने अखेरपर्यंत किल्ला लडवला. धवनच्या नाबाद 99 धावांच्या खेळीमुळे पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. शिखर धवन याने 66 चेंडूत 99 धावांची खेळी केली. यामध्ये पाच षटकार आणि 12 चौकारांचा समावेश आहे.
पंजाबची फंलदाजी ढासळली -
हैदराबादच्या भेदक माऱ्यासमोर पंजाबची फलंदाजी ढासळली. शिखर धवनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. भन्नाट फॉर्मात असलेला प्रभसिमरन याला खातेही उघडता आले नाही. तो गोल्डन डकचा शिकार झाला... त्याला भुवनेश्वर कुमार याने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर पंजाबकडून पहिला सामना खेळणाऱ्या मॅथ्यू शॉर्ट याचा अडथळा मार्को जानसन याने दूर केला. मॅथ्यू शॉर्ट फक्त एका धावावर तंबूत परतला. त्यानंतर जितेश शर्माही चमकदार कामगिरी करु शकला नाही. जितेश शर्मा चार धावावर मार्को जानसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. सॅम करन याने चांगल्या सुरुवातीनंतर विकेट फेकली. सॅम करन याने 15 चेंडूत 22 धावांचे योगदान दिले. सॅम करन मयांक मार्केंडेयचा शिकार झाला. सिंकदर राजा याला उमरान मलिक याने तंबूत पाठवले. सिंकदर रजा पाच धावांचे योगदान देऊ शकला. शाहरुख खान याला मयांक मार्केंडेय याने बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. शाहरुख खान फक्त चार धावांवर बाद झाला. त्यानंतर हरप्रीत ब्रार उमरानच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. हरप्रीतला एक धाव काढता आली. नॅथन इलीस आणि राहुल चहर एकही धाव न काढता तंबूत परतले.
हैदराबादची भेदक गोलंदाजी -
हैदराबादच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून पंजाबच्या फलंदाजांची शिकार केली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत एकापाठोपाठ एका फलंदाजांना त्यांनी तंबूत पाठवले. मयांक मार्केंडेय याने चार षटकात 15 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. हैदराबादकडून तो सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज ठरला. त्याशिवाय उमरान मलिक याने दोन विकेट घेतल्या. भुवनेशव्र कुमार याने एक विकेट घेतली. तर मार्को जानसन याला दोन विकेट मिळाल्या. वॉशिंगटन सूंदर याला एकही विकेट मिळाली नाही.