IPL 2024 : चेन्नई नव्हे तर हा संघ चषक उंचवणार, गावसकरांनी केली सर्वात मोठी भविष्यवाणी
IPL 2024 Winner : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली. चेन्नई(CSK), कोलकाता आणि पंजाब यांनी आयपीएलची विजयी सुरुवात केली.
Sunil Gavaskar prediction for IPL 2024 Winner : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली. चेन्नई(CSK), कोलकाता आणि पंजाब यांनी आयपीएलची विजयी सुरुवात केली. आरसीबी(RCB), दिल्ली आणि हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. आजही आयपीएलच्या (IPL 2024) मैदानात दोन सामने होत आहेत. चेन्नईनं आरसीबीचा पराभव करत विजयानं सुरुवात केली. यंदाही चेन्नईला विजयाचा दावेदर म्हटलं जातेय. चाहत्यांसोबतच आजी-माजी खेळाडूही आयपीएल 2024 च्या जेतेपदाचा अंदाज व्यक्त करत आहेत. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar on IPL 2024) यांनीही यंदाच्या आयपीएल विजेत्याबाबत भविष्यवाणी केली आहे.
सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्स चॅनलवर समालोचन करताना आयपीएल जेतेपदाची भविष्यवाणी केली. सुनील गावसकरांच्या मते चेन्नई नव्हे तर मुंबई यंदाच्या आयपीएल चषकावर नाव कोरेल. गावसकर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाले की, "मैं मुंबई का हूं तो मैं चाहता हूं कि MI खिताब जीते लेकिन मेरा दिल तो थाला (CSK) के साथ है". दरम्यान, भारताचा माजी खेळाडू इरफान पठाण याच्या मते यंदा आरसीबी चषकावर नाव कोरेल. अंबाती रायडू आणि हरभजन सिंह यांच्यामते यंदाच्या आयपीएल चषकावर चेन्नई नाव कोरेल. तर केवीन पीटरसनच्या मते पंजाब पहिल्यांदा चषक उंचावेल. तर ब्रायन लाराच्या मते कोलकाता तिसऱ्यांदा चषकावर नाव कोरेल. रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांनी मुंबई चषक जिंकेल, असा अंदाज व्यक्त केला.
यंदा आयपीएलचा 17 वा हंगाम सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या आयपीएलवर (IPL Winners List from 2008 to 2024) चेन्नई आणि मुंबईनं वर्चस्व गाजवलं आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच पाच वेळा चषकावर नाव कोरले आहे. हैदराबाद आणि कोलकाता संघाने प्रत्येकी दोन वेळा, तर राजस्थान आणि गुजरात संघाने प्रत्येकी एकवेळा चषकावर नाव कोरलेय. यंदाही चेन्नई आणि मुंबईला जेतेपदाचा दावेदार माणलं जात आहे.
Star Sports experts prediction for IPL 2024 Champions:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 22, 2024
Ambati Rayudu - CSK.
Kevin Pietersen - Punjab Kings.
Harbhajan Singh- CSK.
Brian Lara - KKR.
Ravi Shastri - Mumbai Indians.
Sunil Gavaskar - Mumbai Indians. pic.twitter.com/P5gRilPibH
चेन्नईची शानदार सुरुवात, आज मुंबईचा सामना -
आयपीएलच्या 17 व्या हंगामात चेन्नईने दिमाखात सुरुवात केली. चेन्नईने पहिल्याच सामन्यात आरसीबीचा पराभव केला. आज मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स उतरणार आहे. चेन्नईनं ऋतुराज गायकवाडकडे संघाची धुरा दिली आहे. आयपीएलच्या 17 वर्षांमध्ये पहिल्यांदाच धोनी, रोहित आणि विराट फक्त खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहेत.