एक्स्प्लोर
SRH vs PBKS, Top 10 Key Points : अखेरच्या लीग सामन्यात पंजाब विजयी, हैदराबादचा पाच विकेट्सनी पराभव, वाचा सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे
IPL 2022 : सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यातील मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडलेल्या लियामच्या तुफानी खेळीच्या जोरावर पंजाबने 5 विकेट्सने विजय मिळवला.
SRH vs PBKS, IPL 2022 : यंदाच्या आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील 70 व्या सामन्यात पंजाब किंग्स संघाने सनरायजर्स हैदराबादवर (PBKS vs SRH) 5 गडी राखून विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने 158 धावांचे माफक आव्हान पंजाबला दिले. पण लियाम लिव्हिंगस्टोनच्या तुफानी खेळीच्या जोरावर हे आव्हान 15.1 षटकात पंजाबने 5 गडी गमावून पूर्ण केले. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
SRH vs PBKS 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आज पंजाबच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत हैदराबादला 157 धावांवर रोखलं. हरप्रीत ब्रारने यावेळी भेदक गोलंदाजी केली.
- पहिली फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात खराब झाली अवघ्या 4 धावा करुन सलामीवीर प्रियाम बाद झाला.
- प्रियाम बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला खास साथ मिळाली नाही. इतर खेळाडू काही धावा करत तंबूत परतले.
- अभिषेक शर्माने केवळ 43 धावांची एकहाती झुंज दिली. त्याच्या खेळीमुळे संघाची धावसंख्या 157 धावांपर्यंत पोहोचली.
- पंजाबकडून नॅथन अॅलीस आणि हरप्रीत ब्रार यांनी सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर कागिसो रबाडा याने देखील एक विकेट घेतली.
- 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पंजाब संघाकडून बेअरस्टो आणि धवन जोडीच्या मदतीने चांगली सुरुवात केली.
- पण बेअरस्टो 23 धावांवर बाद झाला. शिखर मात्र टिकून होता.
- शाहरुखने आणि जितेश यांनी प्रत्येकी 19 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
- लियाम याने मात्र अत्यंत तुफान खेळी केली. त्याने 22 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. यावेळी 2 चौकार आणि 5 षटकार त्याने ठोकले. ज्यामुळे पंजाबने 15.1 षटकातचं आव्हान पार करत स्पर्धेचा शेवट गोड केला.
हे देखील वाचा-
- SRH vs PBKS, Match Highlights : पंजाब किंग्ससाठी शेवट गोड, हैदराबादवर 5 गडी राखून विजय
- ENG vs IND: इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा; पुजाराचं पुनरागमन
- Team India Squad against South Africa : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ जाहीर, केएल राहुलकडे कर्णधारपद तर उम्रान मलिकला संधी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement