एक्स्प्लोर

Accident: भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त

Accident: प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की कार अचानक डंपरसमोर आली. डंपर चालकाने ब्रेक लावला, परंतु वेग जास्त असल्याने तो नियंत्रण ठेवू शकला नाही. अनियंत्रित डंपर कारवर उलटला. कार पूर्णपणे चिरडली गेली

Accident: खडी वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरचा ताबा सुटून थेट कारवर कोसळल्याने  झालेल्या भयावह अपघातात चार वर्षांच्या मुलासह सात जणांचा मृत्यू झाला. डंपरमध्ये खडी भरलेली होती. वेग जास्त असल्याने डंपरचा ताबा सुटला आणि थेट कारवर कोसळला. खडी कारवर पडल्याने कार अगदी दोन फुटापर्यंत चक्काचूर झाली. संपूर्ण कार डंपर आणि खडीखाली चिरडली गेली. 5 फूट लांबीची कार फक्त दोन फूट राहिली होती. तीन क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला काढण्यात आला. खडी काढण्यासाठी काही तास लागले. काल 28 नोव्हेंबर रोजी सकाळी, अपघातग्रस्त कुटुंब त्याच्या काकांच्या अंत्यसंस्काराला जात होते. कारमध्ये सात लोक होते. महेंद्र यांची पत्नी राणी (50), मुलगा संदीप (24), मोठी बहीण जूली (24), जूलीचा मुलगा अनिरुद्ध (4), महेंद्रचा जावई शेखर (28), मेहुणीचा मुलगा विपिन (20) आणि मेहुणा उमेश सैनी अशी मृत पडलेल्यांची नावे आहेत.  

डेहराडूनहून येणारा भरधाव डंपर कारवर उलटला

उत्तर प्रदेशातील हे कुटुंब सय्यद माजरा गावातून सहारनपूरमधील गंगोह येथे अंत्यसंस्कारासाठी जात होते. एकाच कुटुंबातील सात सदस्य कारमध्ये होते. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिस अधीक्षक (शहर) व्योम बिंदल यांनी सांगितले की कारमधून सात मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. गगलहेडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहारनपूरमधील सय्यद माजरा गावातील एक कुटुंब शुक्रवारी सकाळी 9:15 वाजता दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवेवर कारमधून निघाले. कार गावाबाहेर एक्सप्रेसवेवर पोहोचलीच होती तेव्हा डेहराडूनहून येणारा भरधाव डंपर  उलटला.

कार पूर्णपणे चिरडली गेली

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की कार अचानक डंपरसमोर आली. डंपर चालकाने ब्रेक लावला, परंतु वेग जास्त असल्याने तो नियंत्रण ठेवू शकला नाही. अनियंत्रित डंपर कारवर उलटला. अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे चिरडली गेली आणि कुटुंब आत अडकले. संदीप आणि त्याची आई राणी यांच्यावर शुक्रवारी सय्यद माजरा गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगी जूली, जावई शेखर आणि मुलगा अनिरुद्ध यांच्यावर हरिद्वारमधील चांगा मछली भगवानपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. महेंद्र यांच्या मोठ्या मुलाचे सासरे उमेश यांच्यावर हरिद्वारमधील रावली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. महेंद्र यांच्या मेहुण्यांचा मुलगा विपिन यांच्यावर दौलतपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

एक तासानंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले

गावचे सरपंच म्हणाले, "मी माझी गाडी महामार्गाच्या कडेला घेऊन उभा होतो. डंपरमध्ये खडी अधिक भरली होती आणि 100 किमी/तास पेक्षा जास्त वेगाने जात होता. चालकाने वेगाने वळताच त्याचे नियंत्रण सुटले आणि तो कारवर उलटला. चालकही मद्यधुंद अवस्थेत होता. अनेक क्रेनच्या मदतीने डंपर बाहेर काढण्यात आला. एक तासानंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. संदीपला बाहेर काढले तेव्हा तो श्वास घेत होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याचा मृत्यू झाला."

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Election : सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मोठा पराभव
सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा पराभव
Ayodhya Ram Mandir : रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
Embed widget